शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सिक्किमचा विक्रम अबाधित!

By admin | Updated: February 11, 2015 02:16 IST

विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये अनेक स्थानिक पक्षांनी यशाचा झंझावात निर्माण करून एकतर्फी निवडणुका जिंकण्याचा विक्रम केला आहे

वसंत भोसले, कोल्हापूरविविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये अनेक स्थानिक पक्षांनी यशाचा झंझावात निर्माण करून एकतर्फी निवडणुका जिंकण्याचा विक्रम केला आहे. विरोधकांना किमान १० टक्के जागा जिंकून अधिकृत विरोधी पक्षाचे स्थानही मिळू दिलेले नाही. तसाच प्रकार आज (मंगळवारी) दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) ७०पैकी ६७ जागा जिंकून घडवून आणला असला तरी सिक्किममधील २००९च्या निवडणुकीत सिक्किम डेमॉक्रॅटीक फ्रंटने नोंदविलेला विक्रम अबाधित आहे. या पक्षाने सिक्किम विधानसभेच्या ३२पैकी ३२ जागा जिंकल्या होत्या. असा विक्रम देशातील कोणत्याही विधानसभेत व कोणत्याही पक्षाने आजवर नोंदवलेला नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५२पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भारतीय राज्यघटनेनुसार होत आलेल्या आहेत. त्या निवडणुकांचे निकाल संख्याशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यासाचे आणि मनोरंजनाचेही आहेत. आपल्या देशात २९ राज्य विधानसभा आणि २ केंद्रशासित (दिल्ली आणि पाँडेचेरी) विधानसभा आहेत. यापैकी महाराष्ट्र, आसाम, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, सिक्किम, आणि आता दिल्लीच्या निवडणुकीत एखाद्या पक्षाने एकतर्फी निवडणुका जिंकून सत्ता हस्तंगत केली आहे. महाराष्ट्रात पहिल्या विधानसभा निवडणुकीत १९६२मध्ये काँग्रेसने २६४पैकी २१५ जागा जिंकल्या होत्या. किमान २६ जागा जिंकून विरोधीपक्षाचे स्थान कोणत्याही पक्षाला मिळविता आले नव्हते. प्रजा समाजवादी पक्षाला ९, समाजवादी १, शेतकरी कामगार पक्ष १५, रिपब्लिकन ३, कम्युनिस्ट पक्षाला ६ जागा मिळाल्या होत्या तर उर्वरित १५ जागा अपक्षांनी जिंकल्या होत्या. असाच विक्रम १९९१मध्ये तामिळनाडूत जयललिता यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकने काँग्रेसबरोबर आघाडी करून निवडणूक लढवताना केला आहे. या आघाडीने तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांपैकी २२४ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी १६८ जागा जिंकणाऱ्या अण्णा द्रमुकला १६४ तर काँग्रेसने ६५ जागा लढवत ६० जागा जिंकल्या होत्या. एम. करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ द्रमुक पक्षाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले होते.