शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Mission Shakti: मिशन शक्तीनं कशी वाढणार भारताची शक्ती? जाणून घ्या संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 13:15 IST

मिशन शक्तीच्या यशानं भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा

मुंबई: भारतानं अवघ्या तीन मिनिटांमध्ये अवकाशातील उपग्रह पाडत इतिहास घडवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांशी संवाद साधत याबद्दलची घोषणा केली. यावेळी मोदींनी या क्षेपणास्त्राची निर्मिती करणाऱ्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. भारतीय क्षेपणास्त्रानं (A-SAT) पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. या मोहिमेला 'शक्ती' असं नाव देण्यात आलं होतं. अवकाशातील उपग्रह क्षेपणास्त्रांच्या मदतीनं पाडण्याची क्षमता जगातील अवघ्या तीन देशांकडे आहे. त्यामुळे अशी क्षमता असणारा भारत चौथा देश ठरला आहे. भविष्यातील युद्ध अवकाशात होईल, असं म्हटलं जातं. त्या दृष्टीनं भारताचं ऑपरेशन महाशक्ती अतिशय महत्त्वपूर्ण ठरतं. अवकाशात असलेले, देशासाठी त्रासदायक ठरणारे उपग्रह पाडण्याची क्षमता आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीनकडे होती. आता भारतानंदेखील या देशांच्या यादीत स्थान मिळवलं. यामुळे भविष्यात कोणत्याही देशाचा उपग्रह भारतासाठी त्रासदायक ठरत असेल, तर तो पाडला जाऊ शकतो. चीननं या क्षेत्रात आघाडी घेतली होती. मात्र आता हे तंत्रज्ञान भारतानंदेखील विकसित केलं आहे. सामरिकदृष्ट्या भारताचं हे यश अतिशय मोठं आहे. अवकाशात असलेल्या उपग्रहांचा वेग अतिशय जास्त असतो. अवघ्या तास-दीड तासात उपग्रह पृथ्वीच्या भोवती एक प्रदक्षिणा घालतात. पृथ्वीपासून दूर असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी वेग आणि अचूकता महत्त्वाची असते. योग्य उपग्रहाचा वेध घेण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक असतं. याशिवाय वेगानं पृथ्वी प्रदक्षिणा करत असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी क्षेपणास्त्रानं वेग घेणं गरजेचं असतं. क्षेपणास्त्रानं उपग्रहाचा अचूक वेध न घेतल्यास ते पृथ्वीवर पडू शकतं. हा अतिशय मोठा धोका असतो. त्यामुळेच मिशन शक्तीमध्ये आव्हानांचा डोंगर होता. मात्र त्या सर्वांवर मात करत डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी यश मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.  

टॅग्स :isroइस्रोUSअमेरिकाchinaचीनrussiaरशिया