शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धू यांना शिक्षा भोगावीच लागेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 05:17 IST

उत्तम क्रिकेटपटू, समालोचक आणि टीव्ही वाहिन्यांवरील विनोदी कार्यक्रमांद्वारे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणारा नवज्योत सिद्धू राजकारणात गेल्यानंतर मात्र भलताच अडचणीत सापडला आहे.

- बलवंत तक्षकचंदीगड : उत्तम क्रिकेटपटू, समालोचक आणि टीव्ही वाहिन्यांवरील विनोदी कार्यक्रमांद्वारे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणारा नवज्योत सिद्धू राजकारणात गेल्यानंतर मात्र भलताच अडचणीत सापडला आहे. तो पंजाबमधील मंत्रिमंडळात असला तरी त्याच सरकारने नवज्योत सिद्धू यांना एका जुन्या प्रकरणात तीन वर्षे शिक्षा व्हायलाच हवी, असे सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.नवज्योत सिद्धू याला १९८८ साली एका कार अपघात प्रकरणात न्यायालयाने तीन वर्षे शिक्षा सुनावली होती. त्या प्रकरणात त्याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला असल्याने तो मोकळेपणे फिरू शकतो. पण त्या प्रकरणात त्याला दिलेली तीन वर्षांची शिक्षा कायम ठेवावी, असे पंजाब सरकारने न्यायालयाला सांगितले आहे. दुसरीकडे पीडित कुटुंबीयांनी सिद्धूची शिक्षा वाढवण्यात यावी, अशी भूमिका घेतली आहे.पंजाबात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात सिद्धू असला तरी त्या दोघांतून विस्तव जात नाही. दोघे एकमेकांविषयी चांगले बोलत असले, जाहीर कार्यक्रमात गळ्यात गळे घालत असले तरी त्यांच्यात फारसे सख्य नाही. त्यातच नवज्योत सिद्धू यांनी शिक्षा भोगायलाच हवी, असे पंजाब सरकारने म्हटल्यामुळे दोन नेत्यांतील वाद पराकोटीला जाईल, अशी चर्चा आहे. सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील नगरपालिका, महापालिका काँग्रेसने जिंकल्या. पण महापौर निवडताना सिद्धू यांना अजिबातच विचारात घेतले नाही. अमृतसरमध्ये तर त्यांना नको असलेल्या व्यक्तीला महापौर करण्यात आले. एकूणच मंत्री असलेले सिद्धू काँग्रेसमध्ये अद्याप अस्थिरच आहेत. त्यातच पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचे आसन अधिकच अस्थिर होण्याची चिन्हे आहेत.काँग्रेसमधील या वादाचा फायदा घेत भाजपाने सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपाचे केंद्रीय सचिव तरुण चुघ म्हणाले की, आपल्याच मंत्र्याच्या विरोधात पंजाब सरकार गेले आहे. असे प्रथमच घडते आहे. त्यामुळे सिद्धू यांनी राजीनामा द्यावा वा मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावरून दूर करावे.>काँग्रेसमध्ये घेण्यावरून होती नाराजीआधी भाजपामध्ये असलेले नवज्योत सिद्धू हे काँग्रेसमध्ये आले राहुल गांधी यांच्यामुळे. त्याआधी ते आम आदमी पक्षात जाणार, अशी चर्चा होती. सिद्धू व केजरीवाल यांच्यात बोलणीही सुरू होती. आपने त्यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन न दिल्याने आणि पंजाबमध्ये आपला सत्ता मिळेल, अशी खात्री न वाटल्यामुळे सिद्धू काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागताला स्वत: कॅप्टन अमरिंदर सिंग अजिबात उत्सुक नव्हते, या इतिहासाचा इथे उल्लेख करणे गरजेचे आहे.नवज्योत सिद्धू यांना शिक्षा झाली असल्याने म्हणजेच ते दोषी ठरले असल्याने त्यांना मंत्री करण्यास कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह काँग्रेसमधील अनेक नेत्यांचा विरोध होता. पण शिक्षेला न्यायालयाने दिलली स्थगिती व मिळालेला जामीन यांमुळे त्यांना मंत्री करण्यात काहीही कायदेशीर अडचण नाही, असा सल्ला कायदेतज्ज्ञांनी काँग्रेसला दिला होता. त्यामुळे सिद्धू मंत्री झाले. पण ते किती काळ टिकणार, हा प्रश्नच आहे.