शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

साईडप˜ीने घेतला सेवानिवृत्त उपप्राचार्याचा बळी महामार्गावरील घटना : अंगावरुन ट्रक गेल्याने चौधरी जागीच ठार

By admin | Updated: August 4, 2016 19:39 IST

जळगाव: साईडप˜ीवर दुचाकी घसरल्याने खाली कोसळलेल्या व्ही.जे.चौधरी (वय ७४ रा.ए.टी.झांबरे विद्यालयासमोर, जळगाव, मुळ रा.भालोद, ता.यावल) यांना मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रीय महामार्गावर शिवकॉलनीजवळ घडली.

जळगाव: साईडप˜ीवर दुचाकी घसरल्याने खाली कोसळलेल्या व्ही.जे.चौधरी (वय ७४ रा.ए.टी.झांबरे विद्यालयासमोर, जळगाव, मुळ रा.भालोद, ता.यावल) यांना मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रीय महामार्गावर शिवकॉलनीजवळ घडली.
चौधरी हे मू.जे.महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य होते. सेवानिवृत्तीनंतर ते केसीईतच विविधता संस्था संचालक म्हणून कार्यरत होते. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या पिंप्राळा येथील निवासस्थानावरुन स्विमींग व गीता पठणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुचाकीने (क्र.एम.एच.१९ ए.जे.४४२४) घरी जात असताना शिव कॉलनीजवळ महामार्गाला लागत असताना साईडप˜ीवरुन दुचाकी घसरल्याने ते महामार्गाच्या दिशेने कोसळले, त्याच वेळी मागून येणार्‍या सिमेंट भरलेल्या ट्रकने (क्र.एम.एच.१८ ए.ए.७८६८) त्यांना जोरदार धडक दिली. यात डाव्या बाजूचा खांदा व छातीला जबर धक्का बसला तर डोक्यालाही दुखापत झाली, त्यामुळे काही क्षणातच ते गतप्राण झाले.
पंधरा मिनिटातच आला मृत्यूचा निरोप
केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, व्ही.जे.चौधरी व डॉ.टोके हे दररोज सकाळी सहा वाजता बेंडाळे यांच्या पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर स्विमींग व त्यांनतर गीता पठण करतात.गुरुवारीही नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम झाल्यानंतर ९.१५ वाजता ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले व साडे नऊ वाजता ते अपघातात ठार झाल्याचा निरोप बेंडाळे यांना आला.
कर्मचार्‍याने ओळखले स्टिकरवरून
महामार्गावर अपघात झाल्याने दोन्ही बाजूंनी अर्धा कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वेळी मू.जे.महाविद्यालयाचे लिपिक नंदू नेहते त्या मार्गावरुन जात असताना उत्सुकता म्हणून कोण आहे हे बघायला गेले असता चौधरी हे छातीवर झोपल्याच्या अवस्थेत पडले होते त्यामुळे चेहरा दिसत नव्हता. दुचाकीवर संस्थेचे स्टिकर लावलेले होते, त्यामुळे संस्थेशी निगडित कोणीतरी व्यक्ती असावी म्हणून त्यांनी महाविद्यालयात फोन करुन दुचाकीचा क्रमांक कळवला. गर्दीत नागरिकांनी चौधरी यांना सरळ केले असता नेहते यांनी त्यांना ओळखले व तातडीने त्यांचा मुलगा हर्षल व बेंडाळे यांना अपघाताची माहिती दिली.
पत्नी व मुलाचा प्रचंड आक्रोश
चौधरी यांचा मृतदेह पाहून मुलगा याने घटनास्थळावरच हंबरडा फोडला तर पत्नी प्रमिला यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेवून आक्रोश केला. त्यांचा मन हेलावणारा आक्रोश पाहून चौधरी यांचे नातेवाईक व सहकार्‍यांनी पत्नीला तातडीने घरी पाठविले. मुलगी विभावरी ही विवाहित असून पतीसह बंगळुरु येथे वास्तव्याला आहे.