शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

विकास पडला बाजूला, ‘राम-राफेल’च चर्चेत; भाजपाच्या होर्डिंग्जवर झळकले अटलबिहारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 08:11 IST

छत्तीसगड निवडणूक : स्टार प्रचारकांच्या सभा सुरू होताच, प्रचारात आले राष्ट्रीय मुद्दे

योगेश पांडे

रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराची रणधुमाळी संपायला तीनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांची इथे गर्दी व्हायला लागली आहे. काँग्रेस-भाजपाच्या बड्या नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारण तापू लागले आहे. मात्र स्थानिक विकासाच्या मुद्द्यांपेक्षा राम मंदिर व राफेल विमाने, नोटाबंदी, घराणेशाही यावरच जास्त भर दिला जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यंदा भाजपाच्या होर्डिंग्जवर माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे छायाचित्रही दिसत आहे.

पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त भागातील समस्यांवर जास्त भर देण्यात आला होता. मात्र दुसºया टप्प्यातील ७२ जागांसाठी २0 डिसेंबरला होणाºया मतदानासाठी भाजपाने विकास तर कॉंग्रेसने गरिबी व भ्रष्टाचार या मुद्द्यांना केंद्रबिंदू केले होते. मात्र गेल्या काही दिवसांत स्टार प्रचारकांच्या सभा सुरू होताच, प्रचाराचे मुद्दे बदलत गेले. काँग्रेसने जीतबो छत्तीसगड मोहीम सुरू केली आहे. मात्र नेत्यांच्या भाषणात ही मोहीम कमी आणि राष्ट्रीय मुद्दे जास्त आहेत. राफेलवरून आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद सुरू झाला. गांधी व कॉंग्रेसचे नेते राफेल, नोटाबंदी व भ्रष्टाचार यावरून केंद्रावर सातत्याने टीकास्त्र सोडत आहे.भाजपातर्फे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाजू सांभाळली असून, ते ३१ सभा घेणार आहेत. त्यांच्या सभांना गर्दी होत असली, तरी ते राम मंदिरावरच बोलत आहेत आणि नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमधील घराणेशाहीचा मुद्दा आणायला सुरुवात केली आहे.दुसºया टप्प्यात अनेक जागा या आदिवासीबहुल आहेत. या जागांवर मूळत: झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश येथील नागरिकांचादेखील अधिक समावेश आहे. येथील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने तर झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमधील अनेक नेत्यांना विविध जबाबदाºया दिल्या आहेत. यात मंत्री, खासदार, आमदार यांचा समावेश आहे. तर काँँग्रेसतर्फे ७२ मतदारसंघांची जबाबदारी ७२ नेत्यांना दिली आहे.मोदी, सिंह यांच्याआधी वाजपेयी२०१३ च्या निवडणुकांमध्ये भाजपचा जाहीरनामा, पक्षाचे होर्डिंग या सर्र्वावर मुख्यमंत्री रमणसिंह व नरेंद्र मोदी यांचेच छायाचित्र दिसून येत होते. यंदा पोस्टर्स व होर्डिंग्जवर अटलबिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र दिसत आहे. भाजपाच्या संकल्पपत्रातदेखील मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याअगोदर अटलजींनाच स्थान देण्यात आले आहे.चाऊरवाले बाबा : आदिवासीबहुल क्षेत्रात भाजपा नेत्यांना मुख्यमंत्र्यांचा उल्लेख रमणसिंग असा न करता ‘चाऊरवाले बाबा’ असा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरिबांना तांदूळ वाटपाच्या योजनेमुळे डॉ.रमणसिंह यांची ओळख ‘चाऊरवाले बाबा’ अशीच आहे. दुर्गम भाग तसेच आदिवासी क्षेत्रात त्यांना केवळ याच नावाने ओळखले जाते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीChhattisgarhछत्तीसगडElectionनिवडणूक