नवी दिल्ली : महाराष्ट्रात विविध पदे भूषविताना उपक्रमशीलता आणि कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे २००१च्या तुकडीचे आयएएस अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची आता पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) उपसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्याखेरीज गुलजार नटराजन (आंध्र), ब्रिजेश पांडे (मणिपूर-त्रिपुरा) आणि मयूरेश माहेश्वरी (उत्तर प्रदेश) या तिघा आयएएस अधिकाऱ्यांवरही पीएमओमध्ये विविध पदांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंगळवारी रात्री या नियुक्तीचे आदेश जारी झाले, तेव्हा परदेशी हे नोंदणी निरीक्षक व मुद्रांक महानिरीक्षक तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या प्रभारी व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी नांदेडचे जिल्हाधिकारी तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्तपद सांभाळले आहे. नियुक्तीच्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी कार्यक्षमतेचा ठसा उमटविला. दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीमुक्त अभियान; यवतमाळ, अकोला आणि नांदेडमधील जलसंधारण अभियान, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकांमांवर निर्भयपणे चालवलेला बुलडोझर अशा अनेक कारणांनी ते सुपरिचित आहेत.
श्रीकर परदेशी ‘पीएमओ’त
By admin | Updated: April 2, 2015 04:47 IST