शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून देशाच्या नव्या संसदेचा श्रीगणेशा! जुन्या संसद भवनाचे नेमके काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 07:28 IST

नव्या संसद भवनाला सहा प्रवेशद्वार असून, गजद्वार, अश्वद्वार आणि गरुड द्वाराचा वापर उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान करतील

नवी दिल्ली - संसदेच्या नव्या इमारतीत मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी कामकाज सुरू झाल्यानंतर जुन्या संसद भवनाची दुरुस्ती करून जतन करण्यात येईल. देश - विदेशातील पर्यटकांना भारताच्या संसदीय परंपरेचा परिचय घडेल. नव्या संसद भवनासोबत वापर करता यावा म्हणून या इमारतीची दुरूस्ती करून संसदेशी संबंधित कार्यक्रमांसाठी तसेच पर्यायी वापरासाठी सज्ज केली जाईल. त्यासाठी रिट्रोफिटिंग करण्याचा प्रस्ताव आहे.

सेंट्रल व्हिस्टाच्या पुनर्विकास योजनेंतर्गत जुन्या संसद भवनाचे संग्रहालयात रुपांतर करून जतन करण्याची योजना आहे. संग्रहालयात रुपांतर झाल्यास पर्यटकांना लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहांमध्येही बसता येईल. जु्न्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित मोतीलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू, दादाभाई नवरोजी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद, लाला लाजपत राय, राजीव गांधी, सरोजिनी नायडू, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, वि. दा. सावरकर यांची तैलचित्र लावण्यात आली आहेत.  

नव्या संसद भवनाला सहा प्रवेशद्वार असून, गजद्वार, अश्वद्वार आणि गरुड द्वाराचा वापर उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान करतील. मकरद्वार, शार्दूलद्वार आणि हंसद्वाराचा वापर खासदार आणि सर्वसामान्य नागरिकांना करता येईल.

संसद भवनात मोदी सरकारचे निर्णय...जम्मू आणि काश्मीर कलम ३७० हटविलेजीएसटी- एक देश एक करप्रणालीवन रँक, वन पेन्शनगरिबांसाठी १० टक्के आरक्षणसंसदेच्या कॅन्टीनमधील भोजनाचे अनुदान संपविले

टॅग्स :ParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदी