शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पद्मावत चित्रपट आधी आम्हाला दाखवा - राजस्थान हायकोर्ट; उत्तरेतील राज्यांत बंदी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:18 IST

सेन्सॉर बोर्डाने सुचविलेले सर्व बदल व कट्स मान्य करूनही 'पद्मावत' चित्रपट आपल्या राज्यात प्रदर्शित होऊ न देण्याचा निर्णय राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश या राज्यांनी घेतला आहे. मात्र तो प्रदर्शित करण्याआधी आम्हाला दाखवा, असे राजस्थान उच्च न्यायालयाने सांगितले आहे. तो पाहिल्यानंतरच त्याच्या प्रदर्शनबाबत निर्णय न्यायालय घेणार आहे.

नवी दिल्ली : सेन्सॉर बोर्डाने सुचविलेले सर्व बदल व कट्स मान्य करूनही 'पद्मावत' चित्रपट आपल्या राज्यात प्रदर्शित होऊ न देण्याचा निर्णय राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश या राज्यांनी घेतला आहे. मात्र तो प्रदर्शित करण्याआधी आम्हाला दाखवा, असे राजस्थान उच्च न्यायालयाने सांगितले आहे. तो पाहिल्यानंतरच त्याच्या प्रदर्शनबाबत निर्णय न्यायालय घेणार आहे.उत्तर प्रदेश, उत्तराखंड हरयाणा ही भाजपाशासित राज्येही तशीच भूमिका घेण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास जेथून सर्वाधिक महसूल मिळण्याची हिंदी चित्रपटांना शक्यता असते, अशाच ठिकाणी ‘पद्मावत’ ला फटका बसण्याची चिन्हे आहेत.राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राज्यात या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दोन दिवसांच्या आत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनीही आपल्या राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा निर्णय जाहीर केला.गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी चित्रपटाला राज्यात बंदी नाही, असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातही चित्रपट प्रदर्शित होण्यात अडचणी येणार नाहीत, असे दिसते. त्याला विरोध करणाºयांची संख्या राज्यात कमी आहे. पण विरोधकांनी गोंधळ घातला, तर राज्य सरकार बंदी घालेल, असे बोलले जाते. गुजरातमध्ये चित्रपटाविरोधात निदर्शने झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचे जाहीर केले आहे. जयराम ठाकूर यांनीही चित्रपटात काहीही बदल केले असले तरी तो हिमाचल प्रदेशात प्रदर्शित होणार नाही, असे गुरुवारीच जाहीर केले.

टॅग्स :Padmavatपद्मावत