शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ईद का चाँद दिखा... देशभरात बुधवारी साजरी होणार 'रमजान ईद'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 21:02 IST

चंद्रदर्शन झाल्यानंतर मस्जिदीतील बैठकीत धर्मगुरूं समक्ष समाज बांधवांनी चंद्रदर्शन घेतल्याची ग्वाही दिली.

नाशिक - देशभरात मंगळवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाले. त्यामुळे उद्या म्हणजेच 5 जून रोजी भारतात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. सऊदी अरबमध्ये 3 जून रोजी चंद्रदर्शन झाले, त्यामुळे 4 जून रोजी तेथे ईद साजरी करण्यात आली. त्यानंतर, आज मुंबईसह देशभरात चंद्रदर्शन झाले. सायंकाळच्या सुमारास स्पष्ट चंद्रदर्शन घडले. 

चंद्रदर्शन झाल्यानंतर मस्जिदीतील बैठकीत धर्मगुरूं समक्ष समाज बांधवांनी चंद्रदर्शन घेतल्याची ग्वाही दिली. त्यामुळे शहरे खतीब यांनी उद्या बुधवारी रमजान ईद साजरी करण्याची घोषणा केली. उद्या देशातील बहुतांश ठिकाणी आणि मोठ-मोठ्या मस्जिदमध्ये सामूहिक नमाजपठण केले जाणार आहे. आज चंद्रदर्शन होईल म्हणून मुस्लिम बांधव आतुरतेने वाट पाहत होते. त्यानुसार चंद्रदर्शन होताच, उद्या ईद साजरी करण्यात येणार असल्याचे मुस्लिम धर्मगुरुंकडून सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून मुस्लीम बांधवांचा सुरू असलेला रोजापैकी, आजचा रोजा यंदाच्या रमजानमधील शेवटचा रोजा ठरणार आहे. भारतासह, पाकिस्तान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि आशियातील बहुतांश देशांमध्ये उद्याच ईद साजरी केली जाणार आहे. यंदाचा रमजानचा महिना 29 दिवसांचा झाला आहे. देशभरात उद्या ईदचा उत्साह दिसणार असून आतापासूनच मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. तर, हिंदू बांधवही मुस्लीम बांधवांच्या घरी जाऊन शिर कुरमा आणि गुलगुले यांची मेजवानी घेण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

 

टॅग्स :RamadanरमजानMuslimमुस्लीम