शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवायला हवं? काय सांगतो लोकांचा मूड? सर्व्हेतून मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 15:04 IST

Seema Haider : सीमाबद्दल लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे...!

पाकिस्तानातून आपला प्रियकर असलेल्या सचिन मीनासोबत नेपाळमार्गे ग्रेटर नोएडातील रबुपुरामध्ये पोहोचलेली सीमा हैदर सध्या देशीतील चर्चेचा विषय बनली आहे. ती खरोखरच प्रेमासाठी भारतात आली, की पाकिस्तानची एजन्ट आहे? यावरही चर्चा सुरू आहेत. यूपी एटीएसनेही तिची चौकशी केली आहे. यातच आता, सीमा हैदरसंदर्भात देशातील नागरिकांचा मूड बदलताना दिसत आहे. तिच्या बद्दल लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यापूर्वीच्या एका सर्वेक्षणात सीमा हैदरला भारतात राहू द्यावे असे लोकांना वाटत होते. मात्र आता, तिला पाकिस्तानात परत पाठवावे, असे लोक म्हणत आहे.

काय सांगतो सर्व्हे? -सीमा हैदरला पाकिस्तानात पाठविले जावे की भारतात राहूदिले जावे? यावर टाइम्स नाऊने सर्व्हे केला आहे. यात 75 टक्के लोकांनी, सीमाला भारतात पाठवायला हवे, तिला भारातून बाहेर काढायला हवे, असे म्हटले आहे. तर केवळ 25 टक्के लोकांनीच तिला भारतात राहू द्यावे, असे म्हटले आहे. या सर्व्हेमध्ये दिल्ली, नोएडा, लखनऊ आणि भोपाळमधील लोकांची मते वेगवेगळी असल्याचे दिसून आली आहेत. 

सर्व्हेच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये सुमारे 63 टक्के लोकांनी सीमाला भारतात राहू देण्याचे समर्थन केले होते. मात्र, सर्व्हेमध्ये लोकांची संख्या जस-जशी वाढत गेली, तस तसा निकालही बदलत केला. आता 75 टक्के लोक सीमाला भारतात ठेवण्यास विरोध दर्शवत आहेत. दरम्यान, यूपी एटीएस, नोएडा पोलीस आणि आयबीकडून सीमा हैदरची चौकशी तसेच तपास सुरू आहे. याशिवाय गुप्तचर संस्थांचीही सीमावर नजर आहे.

सीमाचं राष्ट्रपतींना पत्र  -हेरगिरीचा आरोप आरलेल्या सीमा हैदरने भारतीय नागरिकत्वाची मागणी केली आहे. तिने राष्ट्रपती भवनाकडे याचिकाही केली आहे. तिच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील वकील एपी सिंग यांनी ही याचिका केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सीमाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती केली आहे की, जर आपल्याला माफी मिळाली, तर आपण आयुष्यभर पतीसोबत राहू शकू. एवढेच नाही, तर प्रसिद्ध गायक अदनान सामीला भारतात दीर्घकाळ राहिल्यानंतर नागरिकत्व मिळाले आहे. त्यामुळे आपल्यालाही नागरिकत्व मिळायला हवे. परवानगी मिळाल्यास आपण भारतात सन्मानाने राहू शकू, असेही सीमाने याचिकेत म्हटले आहे. 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPakistanपाकिस्तानCourtन्यायालय