शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पुरुषांनी तिकिटाचे पैसे द्यायचे आणि महिला मोफत प्रवास करणार? प्रवाशाची पोस्ट होतेय व्हायरल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:57 IST

Karnataka Bus Service News: कर्नाटकमध्ये महिलांना देण्यात येत असलेल्या मोफत प्रवासाच्या सुविधेबाबत बंगळुरूमधील एका प्रवाशाने लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मागच्या काही वर्षांमध्ये देशातील अनेक राज्यांत महिलांना काही दिवसांपासून ते नियमित मोफत बस प्रवासासारख्या सुविधा लागू करण्यात आल्या आहेत. याचा लाभ लाखो महिलांना होत आहे. तर निवडणुकांमध्ये राजकीय लाभ सत्ताधाऱ्यांना होतो. दरम्यान, महिलांना देण्यात येत असलेल्या मोफत प्रवासाच्या सुविधेबाबत बंगळुरूमधील एका प्रवाशाने लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी महिलांना देण्यात येत असलेल्या मोफत प्रवासाच्या सुविधेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या पोस्टबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच सोशल मीडियावर आतापर्यंत ही पोस्ट १० लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. तसेच हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

किरण कुमार असं ही पोस्ट लिहिणाऱ्या प्रवाशाचं नाव आहे. या पोस्टमध्ये ते लिहितात की, मी बंगळुरू येथून म्हैसूरसाठी सकाळी बस पकडली. तिचं तिकीट २१० रुपये एवढं होतं. केएसआरटीसीची आरामदायक बस आणि जलद प्रवासासाठी जागतिक दर्जाचा महामार्ग, अशा सर्व सुविधा होत्या. मात्र मी काही गोष्टी सांगू इच्छितो, असं सांगत त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत.  - बसमधील ५० प्रवाशांमध्ये सुमारे ३० महिला होत्या. त्यांना केवळ आधारकार्ड दाखवायचं होतं. बाकी प्रवास मोफत होता. हे योग्य आहे का? हीच समानता आहे का?- उर्वरित २० प्रवासी प्रवासाचं संपूर्ण तिकीट देत आहेत, हे योग्य आहे का?-मी एका वृद्ध प्रवाशाला तिकीट देण्यासाठी खिसे चाचपताना पाहिले. तर त्यांच्या शेजारची तरुण महिला व्हिडीओ कॉलवर बोलत होती, हे योग्य आहे का?-जर राज्याकडे एवढं अतिरिक्त उत्पन्न असेल तर या २० प्रवाशांचाही प्रवास मोफत केला जात नाही.  - जगभरात सब्सिडी आणि कल्याणकारी सेवा ह्या ज्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा लोकांना मिळतात. येथे बंगळुरू आणि  म्हैसूर यांसारख्या श्रीमंत शहरांमधील महिला आहेत. मोफत बस प्रवास असल्याने त्या मोफत प्रवास करत आहेत, हे योग्य आहे का? -  मोफत प्रवासासाठी खर्च होणाऱ्या या रकमेचा वापर सफाई, शहरांमधील खड्डे बुजवण्यासाठी, शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी करता येणार नाही का? या रकमेचा अशाच प्रकारे आणखी काही उपयोग करता येईल. 

या पोस्टच्या शेवटी किरण कुमार लिहितात की, आम्ही मतांसाठी मोफत भेट देण्याच्या दुष्चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे. भविष्यात यामधून बाहेर पडणं कठीण होईल. किरण कुमार यांच्या या पोस्टवर आता उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच काही लोक या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम केलं जात आहे, मोफत प्रवासाच्या माध्यमातून महिलांना सहजपणे उत्पन्नाचं साधन मिळवता येत आहे, असा दावा या योजनेचं समर्थन करणाऱ्यांकडून केला जात आहे.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकTrafficवाहतूक कोंडीSocial Viralसोशल व्हायरल