शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

शोपिआन गोळीबार प्रकरण- लष्करी जवानांनी दगडफेक करणा-यांविरोधात केलं काऊंटर एफआयआर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 18:55 IST

जम्मू-काश्मीरमधल्या शोपियाँमध्ये लष्कराच्या गोळीबारात दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. परंतु या प्रकरणानं आता नवे वळण घेतलं आहे.

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधल्या शोपिआनमध्ये लष्करी जवानांच्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. परंतु या प्रकरणानं आता नवे वळण घेतलं आहे. या प्रकरणात एकीकडे 10 रायफल्सच्या जवानांना जम्मू-काश्मीरमधील पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आरोपी बनवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे लष्करानंही दगडफेक करणा-या तरुणांविरोधात काऊंटर एफआयआर नोंदवलं आहे.लष्कराकडून शोपिआन जिल्ह्यातील गोळीबाराच्या वेळी दगडफेक करणा-या लोकांविरोधात काऊंटर एफआयआर दाखल करण्यात आलंय. शनिवारी पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केलं होतं. ज्यात लष्कराच्या टीमचं नेतृत्व करणारे 10 रायफल्सच्या सैनिकांना आरोपी बनवण्यात आलं होतं. पोलिसांनी जवानांविरोधात हत्या(302) आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी(307) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात लष्करही जवानांच्या बाजूनं उभं राहिलं आहे. आमची या प्रकरणातील भूमिका एकदम स्पष्ट आहे. कोणीही आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असंही मेजर गोगोई म्हणाले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी ईदच्या दिवशीच सुरक्षा जवानांवर स्थानिक तरुणांनी दगडफेक केली होती. श्रीनगरमधील ईदगाह मैदानात मोठ्या प्रमाणात तरुण जमा झाले होते. त्यानंतर त्यांनी सुरक्षा जवानांसह पोलिसांवर दगडफेक केली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी नळकांड्याही फोडल्या होत्या. काश्मीरमधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांनी ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यास परवानगी दिली नव्हती. ईदच्या निमित्तानं जम्मू-काश्मीरमधल्या अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र ईदगाह मैदानावर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याच्या भीतीपायी पोलिसांनी या ठिकाणी जमावबंदी लागू केली होती. पोलिसांचा जमावबंदी आदेश झुगारून ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते. त्यानंतर जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्याच वेळी अनंतनागमध्येही दगडफेक करणारे तरुण आणि सुरक्षा दलाचे जवानांमध्ये वाद झाला होता. दिवसेंदिवस काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती वाढत आहेत. काश्मीरमध्ये अशांतता कायम राहावी, यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील असतो. पाकिस्तानला यात फुटीरतावादी नेत्यांची मदत मिळते. फुटीरतावादी नेतेच तरुणांना लष्करावर दगडफेक करण्यासाठी उद्युक्त करत असतात. तर दुसरीकडे नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबाराच्या घटना सातत्याने घडल्या आहे. त्यात दोन्हीकडच्या सैन्याची जीवितहानी झाली. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने  2017 मध्ये तब्बल 138 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. सरकारशी संबंधित असलेल्या गुप्तहेर खात्यामधील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. नियंत्रण रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.