थोडक्यात नागपूर - जोड
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
कर्म संस्थेतर्फे कलावंतांचा सत्कार
थोडक्यात नागपूर - जोड
कर्म संस्थेतर्फे कलावंतांचा सत्कारफोटो - स्कॅननागपूर : कर्म संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त नागपुरातील प्रसिद्ध कलावंत ज्यांनी महाराष्ट्रभर, देशभर नाव कमाविले आहे, अशा कलावंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे मार्गदर्शक दीनानाथ पडोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे, मनपा उपायुक्त प्रमोद भुसारी, रवींद्र फडणवीस, सचिन दुरुगकर, डॉ. विनोद जैस्वाल, प्रकाश जाधव उपस्थित होते. यात प्रसिद्ध सिने अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचा नागपूर गौरव म्हणून सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नकलाकार राजाभाऊ चिटणीस, बुगीवुगी फेम चिन्मय देशकर यांचा विलास उजवणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्त आयोजित नृत्य व निबंध स्पर्धेतील विजेत्यांनाही उपस्थितांच्याहस्ते पारितोषिक करण्यात आले. याप्रसंगी विलास उजवणे यांनी कला क्षेत्रात नागपूरचे नाव उज्वल करा, असे आवाहन केले.