थोडक्यात नागपूर
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
धनगर युवक मंडळ
थोडक्यात नागपूर
धनगर युवक मंडळ नागपूर : स्वाती लॉन, मानेवाडा रोड येथे धनगर युवक मंडळातर्फे विदर्भस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन माजी आ. प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षपदी आ. रामहरी रूपनवार होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आ. राम शिंदे, आ. रामराव वडकुते, माजी आ. हरिभाऊ भदे, दिलीप ऐडतकर, प्रभाकर लोंढे, अमित ठमके, पुरुषोत्तम डाखोळे, सुभाष ढवळे, हरिभाऊ कानडे, रमेश ढवळे, रामदास पाटील, डॉ. सहावे उपस्थित होते. अण्णा शेंडगे म्हणाले, आरक्षणाबाबत आतापर्यंत विधानसभेत आपण सर्वाधिक प्रश्न विचारले, त्यावर कार्यवाही होते आहे. याप्रंसगी २९ गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वधू-वरांनी मेळाव्यात आपला परिचय करून दिला. याप्रसंगी सर्वच अतिथींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शुभा टेकाडे तर आभार गणेश पावडे यांनी मानले. ---------------------मराठा विद्या प्रसारक समाज मराठा विद्या प्रसारक समाजतर्फे महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून महिला मेळावा व स्वयंरोजगार प्रदर्शनाचे आयोजन सक्करदरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृहात करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन समाजसेवी डॉ. उज्वला देशमुख, यशोधराराजे भोसले, हर्षलाताई साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी देवीदास किरपाने, नरेंद्र मोहिते, भाऊसाहेब सुर्वे, संगिता शिंदे उपस्थित होते. संचालन प्रेमलता जाधव यांनी केले. याप्रसंगी नऊवारी फॅशन शो, नृत्य स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नरेंद्र मोहिते यांनी महिलांना मार्गदर्शन केले. रोहिणी भोसले आणि सीमा भोसले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशी किरपाने, दीपाली मोहिते, सीमा शिर्के, रेखा सुर्वे, मनीषा मोहिते, आशा जगताप, सीमा सुरुषे, लता आंभोरे, पुष्पा शिंदे, सुचिता चव्हाण, मृणाल जाचक, सुरेखा घोरपडे, कुमुदिनी जाधव, रंजिता चव्हाण, रेवती जाधव, विभा गायकवाड यांनी परिश्रम घेतले.