थोडक्यात नागपूर
By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST
ग्रामीण विभागातील ज्येष्ठांना मिळणार ओळखपत्र
थोडक्यात नागपूर
ग्रामीण विभागातील ज्येष्ठांना मिळणार ओळखपत्र नागपूर : ग्रामीण विभागातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न फे स्कॉमच्यावतीने डॉ. आरती सिंह यांना सांगण्यात आले. याप्रसंगी प्रत्येक पोलीस स्टेशन प्रभागात दक्षता समितीवर ज्येष्ठ नागरिकांची नियुक्ती करण्यात येईल तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना ओळखपत्र देण्यात येईल, अशी माहिती सिंह यांनी दिली. ग्रामीण भागातील ज्येष्ठांची लुबाडणूक, चोऱ्या तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी पोलीस बंदोबस्त लावण्याचेही त्यांनी मान्य केले. या बैठकीला मडामे, मनोहरराव खर्चे, भालचंद्र कुळकर्णी, सुरेश रेवतकर, नामदेवराव भोयर, चंद्रशेखर श्रीखंडे, सानीकर कुथे, रमेश थोरात, गांधी उपस्थित होते.