थोडक्यात नागपूर
By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST
मायनारिटी डेमॉक्रॅटिक पार्टी
थोडक्यात नागपूर
मायनारिटी डेमॉक्रॅटिक पार्टी नागपूर : पेशावर येथील दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या मृत विद्यार्थ्यांना पार्टीच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हे राक्षसी कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांचा पार्टीच्यावतीने निषेध करण्यात आला. या घटनेने मानवतेला कलंक लागला. याप्रसंगी पार्टीच्या वतीने दहशतवाद्यांचा विरोध केला गेला. दहशतवादाला कुठलाच धर्म नसतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तालिबान असो वा अल कायदा, आयएसआय वा नक्षलवादी कारवाया यांचे समर्थन केले जाऊ शकत नाही. सकाळी मोठ्या आनंदाने मुलांना शाळेत पाठविणाऱ्या पालकांना दुपारपर्यंत त्यांचे पार्थिवच मिळाले. ही अत्यंत क्लेशदायी घटना आहे. पार्टीच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. -------------व्हीटीएतर्फे महसूलमंत्री खडसे यांना निवेदन विदर्भ टॅक्सपेअर्स असोसिएशन (व्हीटीए)च्या प्रतिनिधी मंडळाने जे. पी. शर्मा यांच्या नेतृत्वात एकनाथ खडसे यांना निवेदन देण्यात आले. पर्यावरण व वन मंत्रालयाची मंजुरी न मिळाल्याने भंडाऱ्याच्या रेती घाटांचा लिलाव झाला नाही. यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान झाले आहे. बांधकाम व्यवसायात रेतीचे मोठे महत्त्व आहे. रेती प्रामुख्याने नागपूर व भंडारा येथून मागविण्यात येते. शासनाने रेती घाटांचा लिलाव न केल्याने रेतीच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. श्हरातील महत्त्वाची बांधकामेही रेतीअभावी थांबली आहेत. रेतीची कमतरता असल्याने अवैध धंदे वाढले आहेत आणि अवैध खनन करण्यात येत आहे. ही अनागोंदी थांबविण्यासाठी शासनाने रेती घाटांचा त्वरित लिलाव करावा, अशी मागणी सचिव तेजिंदरसिंग रेणु यांनी केली आहे. शसानाने रेती घाटांचा लिलाव न केल्याने अप्रत्यक्षपणे वाळुमाफियांना मदत होत आहे. याप्रसंगी खडसे यांनी याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.