शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात नागपूर

By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST

व्हीसीएच्या सुरक्षा रक्षकांचे साखळी उपोषण

व्हीसीएच्या सुरक्षा रक्षकांचे साखळी उपोषण
नागपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएशन, क्रिकेट स्टेडियम, जामठा येथे २१ कर्मचारी सातत्याने कार्यरत होते. या कामगारांना प्रस्थापित कायद्यानुसार कुठल्याही सुविधा आणि वेतन देण्यात येत नव्हते. मालकांच्या संगनमताने कर्मचाऱ्यांची पिळवणूक करण्यात येत होती. यासंदर्भात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कामगारमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अनेकदा निवेदने देण्यात आली. कामगारांना १२ तास काम करण्याच्या वेतनाचा एरियर्सही देण्यात आला नाही. त्यानंतर दुसऱ्याच कंपनीला कंत्राट देऊन सुरक्षा रक्षकांवर बेरोजगारीची पाळी आणण्यात आली. याविरोधात कर्मचाऱ्यांनी रोजंदारी मजदूर सेनेच्या नेतृत्वात जामठा चौक येथे साखळी उपोषणाला प्रारंभ केला. जुन्या कामगारांना कामावर घेण्यात यावे, त्यांना अतिरिक्त कार्यकाळाचे वेतन देण्यात यावे, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने नवीन कंत्राट रद्द करण्यात यावे, सुरक्षा रक्षकांची नोंदणी करण्यात यावी आदी मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. आंदोलनात वसंता हिवरकर, देवराव झाडे, कमला शेंडे, मंजुषा चौहान, सिंधु आष्टनकर, बेबी झगडे, अर्चना कोपरे, पूनम पोटफोडे, गीता कामडी, कविता मेश्राम, शांता पुरी, मारोती धोटे, विनोद सरनाईक, प्रदीप हिवसे, चंदू गिरसावळे, हरीश कोहळे, कमलेश चव्हाण, महेंद्र बागडे, केशव बोरकर आदींचा सहभाग आहे.
-----
नागपुरात चित्रनगरी करण्यासाठी महापौरांना निवेदन
नागपूर : सारथी ही संस्था गेली अनेक वर्षे नागपुरात चित्रनगरी व्हावी यासाठी प्रयत्न करते आहे. ही मागणी सारथीने सर्व स्तरांवर लावून धरली आहे. अजय देवगण आणि अक्षय खन्ना नागपुरात आले असता त्यांनीही ही मागणी रास्त असल्याचे सांगितले. याशिवाय मराठी चित्रपटातील अभिनेते गिरीश ओक, स्मिता तळवलकर, वर्षा उसगावकर, किशोर प्रधान, विलास उजवणे यांनीही या मागणीला दुजोरा दिला आहे. मोहन जोशी यांनीही तसे निवेदन दिले आहे. महापालिकेनेही यात रस दाखविला आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक धोरणात कॅबिनेटची मंजुरीही लाभली आहे. सारथीचे सदस्य अमर वझललवार, डॉ. अनिरुद्ध वझलवार, विद्याधर सहस्त्रबुद्धे, राजू गेडाम यांनी महापौरांची भेट घेऊन नागपुरात चित्रनगरी करण्याबद्दल प्रवीण दटके यांना निवेदन दिले आहे. येथे चित्रनगरी झाल्यास हजारो कोटींची उलाढाल येथे होईल आणि पर्यायाने राज्याला आर्थिक उत्पन्न मिळेल, विकासाला चालना देण्यासाठी चित्रनगरी गरजेची आहे. या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन महापौरांनी सारथीला दिले आहे.