शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

थोडक्यात नागपूर

By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST

विमा कर्मचारी व अधिकारी यांची निदर्शने

विमा कर्मचारी व अधिकारी यांची निदर्शने
नागपूर : सार्वजनिक क्षेत्रातील साधारण विमा कंपन्यात कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांनी लंबित वेतन पुनर्निधारण त्वरित देण्यात यावे, १९९५ च्या पेन्शन स्कीमनुसार पेन्शनची निवड करण्याची कर्मचाऱ्यांना संधी द्यावी आणि तृतीय व व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती धोरणात सुधारणा करण्यात यावी या मागणीसाठी देशभर १५ जुलै रोजी विरोध प्रदर्शन केले. साधारण विमा कंपन्यात कार्यरत कर्मचारी युनियन व असोसिएशन यांच्या संयुक्त फोरमने दिलेल्या कार्यक्रमानुसार हा कार्यक्रम पार पडला. ८ जुलैपासून प्रत्येक बुधवारी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी विरोध प्रदर्शन करणार आहेत. नागपूरला नॅशनल इन्शुरनंस कंपनीच्या धरमपेठ एक्सटेन्शनस्थित प्रादेशिक कार्यालयात विरोधी घोषणांनी कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी परशुराम बारिक, अनंत बोरेकर, नीलेश कोठारे, रवींद्र पडीगेल यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. या आंदोलनात सर्व कर्मचारी उपस्थित होते.
----------------
सर्वाधार ज्येष्ठ नागरिक मंडळाचा वर्धापन दिन
नागपूर : पावनभूमी येथील सर्वाधार ज्येष्ठ नागरिक मंडळाचा ११ वा वर्धापन दिन सोहळा पावनभूमी येथील संस्थेच्या सभागृहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विभागीय अध्यक्ष वि. ल. उपाध्ये अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला न्या. मीरा खडक्कार, जयश्री वाडीभस्मे, फेस्कॉमचे विभागीय सचिव खर्चे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र खंते यांनी प्रास्ताविक तर विजय यंगलवार यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रमात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या मंडळाच्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. यात निळकंठ भुमराळकर, वामन पाटील, चक्रपाल ठाकरे, अरुण दाणी, सुधाकर कानगो, कृष्णकुमार रघुवंशी, मारोती काकोडे, जयराम जठार, सुरेश सदावर्ते, शरद चुटे यांचा त्यांच्या अर्धांगिनीसह सत्कार करण्यात आला. अनुपमा एकनाथ उगलेमुगले यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. मोकदम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय यंगलवार, नक्करवार, जेंगटे, जुगजे, गव्हाळे, जोशी, जुमडे आदींनी परिश्रम घेतले.