शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

VIDEO - नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला शॉर्टफिल्ममधून नरेंद्र मोदींनी सांगितले नोटाबंदीचे फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 11:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एकवर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात हा निर्णय फायद्याचा कि, तोटयाचा ठरला यावर मंथन सुरु आहे.

ठळक मुद्देनोटाबंदीचा निर्णय किती योग्य होता, त्यातून काय फायदे झाले हे सांगण्याचा प्रयत्न मोदींनी या व्हिडिओमधून  केला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एकवर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात हा निर्णय फायद्याचा कि, तोटयाचा ठरला यावर मंथन सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी त्यांच्या टि्वटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. 

नोटाबंदीचा निर्णय किती योग्य होता. त्यातून काय फायदे झाले हे सांगण्याचा प्रयत्न मोदींनी या व्हिडिओमधून  केला आहे. सात मिनिट तेरा सेकंदाचा हा व्हिडिओ एक प्रकारे छोटासा माहितीपटच आहे. विरोधक मात्र आज काळा दिवस साजरा करत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. लोकांच्या नोक-या गेल्या, रोजगार घटले, छोटया व्यापा-यांपासून ते सर्वसामान्यांना या निर्णयाची मोठी झळ सहन करावी लागली असा विरोधकांचा आरोप आहे. 

 

मोदी सरकारमधील मंत्री आज देशाच्या विविध भागांमध्ये जाऊन नोटाबंदीच्या निर्णयाचे फायदे सांगत आहेत तर, विरोधक हा निर्णय कसा चुकला, देशाचे किती नुकसान झाले हे सांगत आहेत. 

दिल्लीत रिझर्व्ह बँकेबाहेर काँग्रेसचं आंदोलननोटाबंदीच्या या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत असताना मंगळवारी रात्रीपासूनच काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दिल्लीतील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाबाहेर रात्री उशीरा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तर दुसरीकडे बुधवारी सकाळी छत्तीसगडमध्ये नोटाबंदीविरोधात काँग्रेसतर्फे मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. 

 

टॅग्स :Note BanनोटाबंदीNarendra Modiनरेंद्र मोदी