शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदाराने पाण्याच्या बॉटलसाठी घेतले जास्त पैसे, कोर्टाने ठोठावला 12 हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 18:06 IST

थंड पाण्याची बाटली, शीतपेय, एनर्जी ड्रिंक यासारखे पेय घेणे विकत घेणे ओघानेच आले. पण यातील किती ग्राहक बाटलीवर छापलेली किंमत पाहून त्यानुसार पैसे देतात? बहुसंख्य ग्राहक विक्रेता मागेल ती किंमत देऊन मोकळे होतात.

बंगळुरू - थंड पाण्याची बाटली, शीतपेय, एनर्जी ड्रिंक यासारखे पेय घेणे विकत घेणे ओघानेच आले. पण यातील किती ग्राहक बाटलीवर छापलेली किंमत पाहून त्यानुसार पैसे देतात? बहुसंख्य ग्राहक विक्रेता मागेल ती किंमत देऊन मोकळे होतात.  बंगळुरूच्या ग्राहक मंचाकडे असंच एक प्रकरण आलं आहे. राघवेंद्र केपी नावाच्या एका व्यक्तीला एका लिटरच्या एका पाण्याच्या बॉटलसाठी 21 रूपये जास्त द्यावे लागले होते.  या फसवणुकीविरोधात राघवेंद्र यांनी किनले मिनरल वॉटर निर्माती कंपनी कोका-कोला, विक्रेता आणि रॉयल मीनाक्षी मॉल   आदींविरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. राघवेंद्र यांना 5 डिसेंबर 2015 रोजी दुकानदाराने 1 लिटर पाण्याची बॉटल 40 रूपयांना दिली होती. पण त्या बॉटलवर 19 रूपये इतकी किंमत होती. त्यानंतर जयानगर येथील एका दुकानातून त्यांनी तीच पाण्याची बॉटल 19 रूपयांना विकत घेतली. या दोन्ही ठिकाणची चलन पावती राघवेंद्र यांनी ग्राहक न्यायालयात जमा केली आणि रॉयल मीनाक्षी मॉलमध्ये विकत घेतलेल्या बॉटलमुळे 21 रूपयांचं नुकसान झालं, त्यांनी फसवणूक केली अशी तक्रार केली. किनले मिनरल वॉटर निर्माती कंपनी कोका-कोलानेही दुकानदाराने फसवणूक केल्याचं मान्य केलं. 2016 च्या सुरूवातीपासून या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू होती. न्यायालयात सुनावणीच्या वेळी दुकानदाराने आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं सांगत तक्रारकर्ता राघवेंद्र खोटं बोलत असल्याचं म्हटलं. पण न्यायालयाने राघवेंद्र यांचा आरोप खरा अशून त्यांच्याकडून 21 रूपये जास्त आकारण्यात आल्याचं म्हटलं. परिणामी कोर्टाने दुकानदाराला12 हजार रूपये दंड ठोठावला आणि तक्रारकर्त्या राघवेंद्र यांना ते पैसे देण्यास सांगितलं. बंगळुरूच्या घ्राहक न्यायालयात आलेला हा निर्णय ग्राहकांच्या होणा-या फसवणुकीला आळा बसवण्यासाठी महत्वाचा मानला जात आहे. 

ग्राहकांचा आवाज-पाण्याची बाटली, शीतपेय असे पदार्थ एमआरपीपेक्षा जास्त किमतीला विकण्याचा प्रघात गेली अनेक वर्षे राजरोसपणे सुरू आहे. देशभरातील काही सजग ग्राहकांनी वेळोवेळी, ठिकठिकाणी तक्रारी केल्या आहेत. काही केसेसमध्ये अशा तक्रारी जिल्हा आणि राज्य पातळीवरील ग्राहक मंचानी फेटाळल्या आहेत. पण अखेर काही ग्राहकांनी जिद्दीनं राष्ट्रीय ग्राहक मंचापर्यंत जाऊन दाद मागितली आहे. आणि त्यातून काही केसेसमध्ये ग्राहकांच्या बाजूनं निकाल लागला आहे.उदाहरणार्थ, दिल्लीचे सचिन धिमन आणि शरण्य यांची ही केस. या दोघांनी भारतीय रेल्वेनं प्रवास करताना आयआरसीटीसी अर्थात रेल्वेला खानपान सेवा पुरवणा-या कंपनीकडून घेतलेली शीतपेयाची बाटली त्यांना 15 रु पयांना पडली, ज्याची एमआरपी फक्त १२ रुपये होती. तीन रुपयांसाठी कशाला लढायचं, असा विचार न करता हे दोघे लढले. दिल्लीच्या जिल्हा तक्रार निवारण मंचानं त्यांच्या बाजूनं निकाल दिला. सचिन धिमन आणि शरण्य यांना न्याय मिळाला. दिल्लीच्या जिल्हा तक्रार निवारण मंचानं दिलेल्या निकालात म्हटलं की, ‘सचिन धिमन आणि शरण्य यांना आयआरसीटीसीनं अन्यायाची नुकसानभरपाई आणि केस लढवण्याचा खर्च आणि त्रास यांचा मोबदला म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये द्यावे तसेच आयआरसीटीसीने दंड म्हणून देशाच्या ग्राहक कल्याण निधीसाठी दहा लाख रुपये द्यावे. तक्र ार करायला हे दोघेच पुढे सरसावले; पण आयआरसीटीसीनं अनेक ग्राहकांना या प्रकारे लुबाडले असणार, म्हणून इतका दंड !’ अशा आणखीही काही केसेसमध्ये ग्राहकांना लुबाडण्याच्या विरोधात ग्राहकांच्या बाजूनं निकाल लागले आहेत.

कशी करायची तक्रार -

महाराष्ट्रभर कुठेही ओव्हरचार्जिंग होत असल्याचं आढळल्यास ०२२-२२८८६६६६ या क्र मांकावर तक्रार नोंदवता येईल. किंवा dclmms_complaints@yahoo.com, dyclmkonkan@yahoo.in इथं इमेलही करता येईल.