शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

Shopian Encounter : मोठी कारवाई ! जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत 5 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 09:49 IST

Shopian Encounter : भारतीय लष्कराने केला पाच दहशतवाद्यांचा खात्मा...

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये भारतीय लष्करानं मोठी कारवाई करत पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. शुक्रवारी (3 ऑगस्ट) संध्याकाळी भारतीय लष्कराला किलोरा गावात लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी परिसरात लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीमेदरम्यान उडालेल्या चकमकीदरम्यान जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा केला. यानंतर शनिवारी (4 ऑगस्ट) सकाळीदेखील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चमकम उडाली. ज्यामध्ये जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. या कामगिरीवर डीजीपी एस.पी. वैद्य यांनी जवानांची पाठ थोपटली आहे.  ट्विटरच्या माध्यमातून डीजपी वैद्य यांनी जवानांना शाबासकी दिली आहे. 

 

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर ठारशुक्रवारी चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर उमर मलिकचा खात्मा करण्यात आला. उमर मलिक असं ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरुन उमर मलिकचं शव ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याजवळील AK-47देखील जप्त करण्यात आली आहे. शोधमोहीमेदरम्यान जवानांनी हवेत गोळीबार केला. त्यावेळेस दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, गावामध्ये आणखी दहशतवादी लपून बसल्याचा संशय भारतीय लष्काराला असल्यानं परिसरात शोधमोहीम राबवण्यात आले आहे. तणावाची परिस्थिती पाहता खबरदारी म्हणून येथील इंटरनेट सेवादेखील बंद ठेवण्यात आली आहे.   

 

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान