शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तरुणी रिप्लाय देईना, पठ्ठ्याने थेट कॉलेजच्या लेटरहेडवरच लिहिलं लव्ह लेटर; पुढे घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 10:21 IST

तरुणाने लिहिलेल्या लेटरवर कॉलेजच्या मुख्याध्यापकांचीही सही होती. त्यामुळे कॉलेज प्रशासन अडचणीत आले.

College Love Letter ( Marathi News ) : कॉलेज तरुण-तरुणींकडून एकमेकांना लव्ह लेटर लिहिण्याचा प्रकार काही नवा नाही. मात्र एका पठ्ठ्याने थेट कॉलेजच्या लेटरहेडवरच आपल्याला आवडत असलेल्या तरुणीला लव्ह लेटर लिहिल्याचा प्रकार पश्चिम बंगालमधील एका शहरात घडला आहे. पश्चिम बंगालमधील गुश्कारा कॉलेजच्या लेटरहेडवर तरुणाने लिहिलेले लव्ह लेटर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. तसंच या लेटरवर कॉलेजच्या मुख्याध्यापकांचीही सही होती. त्यामुळे कॉलेज प्रशासन अडचणीत आले. त्यानंतर या सर्व प्रकरणाबाबत तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या लव्ह लेटरमध्ये एका विद्यार्थिनीला उद्देशून लिहिलं होतं की, "आमच्या कॉलेजचा एक माजी विद्यार्थी तुझ्यावर प्रेम करतो. मात्र तू त्याला कसलाही प्रतिसाद देत नाहीस. त्यामुळे त्याचं आता अभ्यासासह कशावरही लक्ष लागत नाही. मी तुला विनंती करतो की, कृपया त्या विद्यार्थ्याला भविष्यात कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये आणि त्याचं अभ्यासावर लक्ष लागावं, यासाठी काहीतरी कर," अशी विनंती या पत्रातून करण्यात आली होती. या मजकुराच्या शेवटी कॉलेजच्या मुख्याध्यापकांची सहीदेखील करण्यात आली होती.

हे लव्ह लेटर आपल्या बनावट सहीसह व्हायरल झाल्याचं कळताच कॉलेजचे मुख्याध्यापक सुदीप चट्टोपाध्याय यांना मोठा धक्का बसला. त्यांनी याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर आरोपी तरुणाने चट्टोपाध्याय यांची भेट घेत मीच कॉलेजच्या एका जुन्या लेटरहेडवर हे पत्र लिहून तुमची सही केल्याची कबुली दिली. 

दरम्यान, तरुणाने माफी मागत पुन्हा असा प्रकार करणार नसल्याचं आश्वस्त केल्याने मुख्याध्यापक सुदीप चट्टोपाध्याय यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवणं टाळलं आहे.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टwest bengalपश्चिम बंगाल