शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक आकडेवारी! ५५ हजार जवान सैन्यातून पडले बाहेर; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 05:54 IST

निमलष्करी दलात आत्महत्या करण्याच्या सर्वाधिक घटना २०२१ आणि २०२३ मध्ये घडल्या. दोन्ही वर्षांत प्रत्येकी १५७ जवानांनी आत्महत्या केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मागील पाच वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा गार्डसह निमलष्करी दलातील ५५ हजार ५५५ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तर, ७३० जवानांनी आत्महत्या केली आहे.

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत खासदार मुकुल वासनिक यांना दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी), केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि आसाम रायफलचे ५५ हजार ५५५ जवान सेवेतून मुक्त झाले आहेत. यातील ४७,८९१ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. ७,६६४ जवानांनी राजीनामा दिला आहे, तर ७३० जवानांनी आत्महत्या केली आहे.

आकडेवारीनुसार, २०२० मध्ये ७,६८४ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि राजीनामे दिले आहेत. २०२१ मध्ये १२,०१३ आणि २०२२ मध्ये १२,३७१ जवान सेवेतून मुक्त झालेत. मागील पाच वर्षांमध्ये सर्वाधिक नोकरी सोडण्याच्या घटना २०२३ मध्ये घडल्या. या वर्षी १२,३०२ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

किती जवानांनी केल्या आत्महत्या?निमलष्करी दलात आत्महत्या करण्याच्या सर्वाधिक घटना २०२१ आणि २०२३ मध्ये घडल्या. दोन्ही वर्षांत प्रत्येकी १५७ जवानांनी आत्महत्या केली आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानRajya Sabhaराज्यसभा