शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विमा रकमेसाठी स्वत:च्याच खुनाची दिली सुपारी; राजस्थानातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 06:33 IST

: पोलीस तपासातून धक्कादायक माहिती उघड; निर्जनस्थळी मिळाला मृतदेह

जयपूर : राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या नावे काढलेल्या विम्याची रक्कम कुटुंबियांस मिळावी यासाठी भाडोत्री मारेकऱ्यांना ‘सुपारी’ देऊन गेल्या आठवड्यात स्वत:चाच खून करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासातून उघड झाला आहे.

या मुलखावेगळ्या इसमाचे नाव बलबीर असून, त्याचा मृतदेह भिलवाडा जिल्ह्यातील मांगरोप गावात एका निर्जन ठिकाणी मिळाला. त्याचे हात-पाय दोरीने बांधलेले होते व गळ्यावर आवळल्याच्या खुणा होत्या. पोलिसांनी बलबीरच्या खुनाच्या आरोपावरून सुनील यादव आणि राजवीर या दोन आरोपींना अटक केली. हे दोघेही उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांच्या जबानीतून बलबीरने स्वत:च सुपारी देऊन आपला खून करून घेतला, असे उघड झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

बलबीरच्या कुटुंबियांनी मात्र खुनाची सुपारी दिली जाणे किंवा बलबीरने उतरविलेला विमा याचा इन्कार केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार बलबीरने आपला खून करण्यासाठी ८० हजार रुपये दिले. एवढेच नव्हे तर आपला खून कसा व कुठे केला जावा हेही त्यानेच ठरविले व तोच त्याठिकाणी घेऊन गेला, असे आरोपींनी जबानीत सांगितले.

आरोपींच्या या म्हणण्यात कितपत विश्वास ठेवावा हे तपासण्यासाठी पोलिसांनी गावात चौकशी केली असता असे कळले की, बलबीरने गेल्या वर्षभरात लोकांकडून २० लाख रुपये उसने घेऊन ती रक्कम इतरांना चढ्या व्याजाने कर्जाऊ दिली होती; पण या व्यवहारांतून गेल्या सहा महिन्यांत त्याला काहीच कमाई झाली नाही. पैसे उसने दिलेले लोक बलबीरकडे तगादा लावू लागले व त्याने ज्यांना पैसे व्याजाने दिले होते ते परतफेड करण्याचे टाळू लागले. 

८.४३ लाख रुपये हप्ता भरून स्वत:चा ५० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविलापोलिसांच्या म्हणण्यानुसार या दुहेरी कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी मोठ्या रकमेचा विमा उतरवून आयुष्य संपविण्याची भन्नाट योजना त्याच्या डोक्यात शिजली. त्यानुसार त्याने ८.४३ लाख रुपये हप्ता भरून स्वत:चा ५० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला; पण आत्महत्या केली तर विम्याची रक्कम मिळणार नाही, असे त्याला जाणकारांनी सांगितले. म्हणून त्याने मारेकऱ्यांना ‘सुपारी’ देऊन त्यांच्याकरवी आपला खून करून घेण्याची शक्कल लढविली. यामुळे ज्यांच्याकडून पैसे उसने घेतले त्यांचा तगादाही संपेल व आपण नसलो तरी विम्याची रक्कम मिळून कुटुंबाचा चरितार्थ आरामात चालू शकेल, अशी यामागची त्याची कल्पना असावी.