शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ११ रुग्णांची गेली दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 05:30 IST

प्रशासनाकडून रेडक्रॉस निधीतून प्रत्येकी २0 हजार रुपये, तर सरकारकडून ५0 हजार रुपये अर्थसाह्य देण्यात आले आहे.

इंदूर (मध्य प्रदेश) : अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ११ रुग्णांची दृष्टी गेल्याची घटना येथे घडली. राज्य सरकारने कठोर कारवाई करीत रुग्णालयाचा परवाना रद्द केला असून आॅपरेशन थिएटर सील केले आहे.दृष्टी गमवावी लागलेल्या रुग्णांवर टी. थोईथराम रुग्णालयात सरकारी खर्चाने उपचार केले जात आहेत. पीडित रुग्णांना जिल्हा प्रशासनाकडून रेडक्रॉस निधीतून प्रत्येकी २0 हजार रुपये, तर सरकारकडून ५0 हजार रुपये अर्थसाह्य देण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. २0१0 मध्येही याच रुग्णालयात १८ रुग्णांना आपली दृष्टी गमवावी लागली होती.८ आॅगस्ट रोजी इंदौर आय हॉस्पिटलमध्ये अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या डोळ््यात औषध टाकण्यात आले. त्यातून संसर्ग होऊन रुग्णांची दृष्टी गेली. तेथील डॉक्टरांनी दहा दिवसांपर्यंत रुग्णांवर उपचार गेले. तथापि, त्यांची दृष्टी परत आली नाही.राज्याच्या आरोग्यमंत्री तुलसी सिलावट यांनी सात सदस्यीय समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या समितीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन, सीएमएचओ आणि दोन नेत्रतज्ञ यांचा समावेश आहे.२0१0 मध्ये या रुग्णालयात १८ लोकांना दृष्टी गमवावी लागली होती. तत्कालिन सीएमएचओ डॉ. शरद पंडित यांनी हलगर्जीपणा करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची शिफारस केली होती. २0११ मध्ये रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व शिबिरांवर बंदी घालण्यात आली होती. शिबिराच्या आयोजनासाठी सीएमएचओच्या अनुमतीचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र हे प्रतिबंध थोडे दिवसच लागू राहिले. नंतर हे आदेश शिथील झाले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश