शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर वडील लटकलेले, तर आईचा मृतदेह बेडवर; घरात जाताच MBBS विद्यार्थ्याला बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 12:46 IST

आई-वडिलांचे मृतदेह पाहून मुलाला मोठा धक्का बसला. त्याने याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली.

पेशाने डॉक्टर असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या भाजपमध्ये सक्रिय असलेल्या पती-पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील बीना परिसरात ही घटना घडली आहे. डॉ. बलबीर कॅथोरिया आणि डॉ. मंजू कॅथोरिया अशी मृत्यू पती-पत्नीचे नावे आहेत. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोटही आढळली असून कर्जातून नैराश्य आल्याने आत्महत्या करत असल्याचं त्यामध्ये म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बलबीर कॅथोरिया आणि डॉ. मंजू कॅथोरिया यांचा मुलगा पाटणा येथे शिक्षणासाठी वास्तव्यास होता. तेथून घरी आल्यानंतर घरात त्याला आपले वडील लटकलेल्या अवस्थेत आढळले. तसंच आईदेखील बेडवर मृतावस्थेत आढळून आली. आई-वडिलांचे मृतदेह पाहून मुलाला मोठा धक्का बसला. त्याने याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मृत दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

डॉ. बलबीर कॅथोरिया सार्वजनिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते, तर त्यांची पत्नी स्त्री-रोग स्पेशालिस्ट म्हणून काम पाहात होती. त्यांच्या सूचनेनुसार नुकतंच शासकीय रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा सुरू झाली होती.

३ वर्षांपूर्वी मुलीनेही संपवलं होतं जीवन

 कॅथोरिया दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. मात्र त्यांच्या मुलीने तीन वर्षांपूर्वी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली होती. अभ्यासाच्या दबावातून तिने हे पाऊल उचललं होतं. तसंच त्यांचा मुलगा हा पाटणा इथं एमबीबीएसचं शिक्षण घेत आहे. शुक्रवारी रात्री त्याचं आपल्या आई-वडिलांशी फोनवर बोलणं झालं होतं. त्यानंतर तो त्यांच्या भेटीसाठी मध्य प्रदेशातील आपल्या घरी निघाला. मात्र घरी पोहोचण्याआधीच सगळं सपलं होतं. आपल्या आई-वडिलांचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावर ओढावली.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशdoctorडॉक्टर