शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! मुलानेच रेकॉर्ड केला आई - वडिलांचा सेक्स व्हिडीओ

By admin | Updated: May 27, 2017 17:52 IST

आपल्याच आई - वडिलांच्या खासगी क्षणांचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन फेसबूक फ्रेंडला पाठवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 27 - आपल्याच आई - वडिलांच्या खासगी क्षणांचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन फेसबूक फ्रेंडला पाठवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा मुलगा अल्पवयीन असून फक्त 13 वर्षांचा आहे. मुलाच्या आई - वडिलांनी त्याच्या फेसबूक फ्रेंडला पकडण्यासाठी सायबर क्राईम पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्याच्या मित्राने फेसबूकवर धमकी देत आणि ब्लॅकमेल करत आपल्या मुलाला व्हिडीओ रेकॉर्ड करायला लावला असल्याची तक्रार दांपत्याने केली आहे.
 
मुलाच्या वडिलांनी सांगितलं आहे की, "जून 2016 मध्ये आमच्या मुलाने फेसबूवर तेजल पटेल नावाच्या एका मुलाशी मैत्री केली. तो अश्लिल भाषेत त्याच्याशी चॅट करत असे. एप्रिल 2017 पर्यंत हे चालू होतं. तेजल अश्लिल व्हिडीओ, फोटो तसंच चाईल्ड पॉर्नसंबंधी माहिती आमच्या मुलाला पाठवत होता. त्याला कुठूनतरी आमच्या मुलाचा न्यूड फोटो सापडला होता". 
 
"शाळेच्या सुट्ट्यांमध्ये हा मुलगा फेसबूकवर जास्त वेळ घालवू लागला. तेजलने त्याच्याकडून फोन नंबर घेतला आणि फोन करु लागला. तेजलने त्यांच्या मुलाल चाईल्ड पॉर्न पाहण्यासाठी उकसवलं. यानंतर त्याने त्याच्या कुटुंबियांची चौकशी केला आणि त्यांचे न्यूड फोटो पाठवायला सांगितलं", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
पोलिसांनी सांगितलं की, "सुरुवातीला तर मुलाने न्यूड फोटो पाठवण्यास नकार दिला. पण तरीही तेजल वारंवार त्याला फोटो पाठवण्याचा आग्रह करु लागला. यानंतर त्याने न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. धमकीमुळे तो घाबरला. त्याने आपल्या आईचा अर्धनग्न फोटो त्याला पाठवला. यानंतर तेजलने त्याच्या आई - वडिलांच्या खासगी क्षणांचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन पाठवायला सांगितलं. मुलाने व्हिडीओ रेकॉर्ड करुन त्याला पाठवला". 
 
तेजलने व्हिडीओ मिळाल्यानंतर त्याच्या आई - वडिलांचा नंबर घेतला, आणि फोन करुन खंडणी मागू लागला. फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर मुलाच्या वडिलांना धक्काच बसला. आपल्या मुलाने हे फोटो आणि व्हिडीओ पाठवल्याचं पाहून ते हैराण झाले. तेजलने त्यांच्याकडे एक कोटींची खंडणी मागितली आहे. रक्कम मिळाली नाही तर व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड करण्याची धमकी त्याने दिली आहे. 
 
यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तेजलचं अकाऊंट तपासलं तर त्याने बंद केल्याचं लक्षात आलं. पोलीस तपास करत आहेत.