शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! आईची हत्या करून त्याने पिले रक्त, मांत्रिक मुलगा फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 07:45 IST

मांत्रिक मुलगा फरार; छत्तीसगडमधील थरकाप उडविणारी घटना

रायपूर : एका मांत्रिक मुलाने आपल्या आईचीच हत्या केली. त्यानंतर तो तिच्या शरीरातील रक्त पीत होता. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात नववर्षाच्या आदल्या दिवशी घडली. हे भीषण दृश्य पाहणाऱ्या महिलेला बसलेल्या मानसिक धक्क्यानंतर ती त्यातून तीन दिवस सावरू शकली नव्हती. त्यानंतर तिने पोलिसांना हा प्रकार कळविला. पोलीस शुक्रवारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत दिलीप यादव या मुलाने आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे करून ते जाळूनही टाकले होते.

सध्या फरारी असलेल्या दिलीपने आणखी कोणाला इजा करण्याच्या आधीच त्याला अटक करण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत. ज्या गावात ही घटना घडली तेथील रहिवाशांनी सांगितले की, मांत्रिक असलेला दिलीप नेहमी माणसाचा बळी देण्याची भाषा करीत असे. तो आपल्या आईचा चेटकीण म्हणून उल्लेख करायचा. तिच्यामुळे आपले वडील व भाऊ मरण पावल्याचाही तो आरोप करीत असे.मृतदेहाची राख, जळालेली हाडे केली जप्तच्दिलीपने आईची हत्या करून तिचे रक्त पीत असल्याचे रामकचर गावातील समिरन यादवने पाहिले होते. तिने गुरुवारी रात्री चैतमा पोलीस ठाण्यात याबद्दलची माहिती दिली. सुमारिया या ५० वर्षे वयाच्या व शेजारीच राहत असलेल्या महिलेला भेटायला ती ३१ डिसेंबरच्या सकाळी गेली. तिच्या घरातून समिरनला विचित्र आवाज ऐकू आले. दिलीपने आपली आई सुमारियाच्या मान, डोके व छातीवर कुºहाडीने वार करून तिला ठार मारले. त्यानंतर तिच्या जखमेतून वाहणारे रक्त तो प्यायला लागला.च्हे दृश्य पाहून समिरनची बोबडीच वळली व थरथरू लागली. तिने कसाबसा तिथून काढता पाय घेतला व आपल्या घरी गेली. ही घटना कोणालाही सांगायची तिची हिंमत झाली नाही. दोन-तीन दिवसांनंतर तिने ही घटना आपल्या सासºयांना सांगितली.च्सरपंचाबरोबर चर्चा केल्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळविण्यात आला. दिलीपच्या घरी पोलिसांनी जाऊन सुमारियाच्या मृतदेहाची राख, जळालेली हाडे जप्त केली.

टॅग्स :Murderखून