शिवशंकर आमचे पहिले पैगंबर
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
शिवशंकर आमचे पहिले पैगंबर
शिवशंकर आमचे पहिले पैगंबर
शिवशंकर आमचे पहिले पैगंबरहिंदुस्थानातील सगळेच हिंदूजमियतचे मुफ्ती इलियास यांचे वादग्रस्त विधानअयोध्या : भगवान शिवशंकर हे मुस्लिमांचे पहिले पैगंबर होते आणि मुस्लिमांना हे मान्य करण्यात कसलीही अडचण नाही, असे विधान करून जमियत उलेमाचे मुफ्ती मोहम्मद इलियास यांनी आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. तथापि, अन्य मुस्लिम धर्मगुरूंनी मात्र इलियास यांच्या या वक्तव्याचा जोरदार विरोध केला आहे.शिवशंकर पहिले पैगंबर होते, असे वादग्रस्त विधान करूनच इलियास थांबले नाहीत, तर मुस्लिमही सनातनी आहेत आणि हिंदूंचे देव असलेले शंकर आणि पार्वती हे आमचेही आई-बाप आहेत, असे त्यांनी जाहीर केले. देशातील मुस्लिम हे हिंदू राष्ट्राच्या विरोधात नसल्याचेही इलियास म्हणाले.ज्या प्रकारे चीनमध्ये राहणारा चिनी, अमेरिकेत राहणारा अमेरिकन असतो त्याचप्रमाणे हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. हे राष्ट्रावरून पडलेले नाव आहे, असे सांगून इलियास पुढे म्हणाले की, जर आमचे आई-वडील, रक्त आणि देश एक आहे, तर आमचा धर्मही एकच आहे. दरम्यान, अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी इलियास यांच्या वक्तव्याला विरोध केला आहे. (वृत्तसंस्था)