शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची दिशाभूल करण्याचे शिवसेनेचे प्रयत्न

By admin | Updated: October 7, 2016 00:07 IST

नीलेश राणे : जैतापूर प्रकल्पाविरोधी आंदोलनाबाबत खासदार विनायक राऊतांवर टीका

नीलेश राणे : जैतापूर प्रकल्पाविरोधी आंदोलनाबाबत खासदार विनायक राऊतांवर टीकाराजापूर (जि.रत्नागिरी) : जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प रद्द व्हावा असे खासदार विनायक राऊत यांना वाटत असेल, तर त्यांनी संसदेत चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधावे. पण शिवसेनेला तसे करायचे नसून, जनतेची दिशाभूल करून आगामी निवडणुकीत आपली पोळी भाजायची आहे, अशी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी राजापुरात पत्रकार परिषदेत केली.जैतापूर प्रकल्पांतर्गत सुमारे ९० टक्के प्रकल्पग्रस्तांनी शासनाकडून भरपाई घेतली आहे. तरीही नाहक विरोध दाखविला जात आहे. सध्या प्रकल्पस्थळावरील सर्व कामे व्यवस्थित सुरू आहेत. शिवसेनेला मात्र राजकारण करायचे असून, आगामी निवडणुकांवर डोळा ठेऊनच सारे चालले आहे, असा आरोप करीत राणे यांनी शिवसेना खा. विनायक राऊत, आमदार राजन साळवी व माजी आमदार गणपत कदम यांना लक्ष्य केले. (प्रतिनिधी)आघाडीबाबत वरिष्ठ स्तरावरून निर्णयआगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी काँग्रेस -राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेण्यात येईल, असे नीलेश राणे यांनी सांगितले.