भोपाळः मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना छिंडवाड्यातील उमरेठमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी न दिल्यानं राज्यातील राजकारण प्रचंड तापलं आहे. भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी कलेक्टरच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष राकेश सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे कलेक्टरची तक्रार केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते नरेंद्र सलूजाही शिवराज सिंह चौहानांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत.चौरई येथे झालेल्या सभेत शिवराज सिंह चौहानांनी छिंडवाड्यातील कलेक्टर श्रीनिवास शर्मा यांच्यावर नाराजी व्यक्त केली. नाराजी व्यक्त करत ते म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये ममतादीदी हेलिकॉप्टर उतरू देत नाहीत, ममतादीदीनंतर आता मध्य प्रदेशात कमलनाथदादा हेलिकॉप्टर उतरू देत नाहीयेत. सत्तेच्या नशेत एवढे धुंद होऊ नका. ये पिट्टू कलेक्टर लक्षात ठेव रे, आमचे पण दिवस लवकरच येतील, तेव्हा तुझं काय होईल?,
'पिट्टू कलेक्टर लक्षात ठेव, आमचे दिवसही लवकरच येतील'; शिवराज भडकले, तावातावाने बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 11:42 IST