शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल
By admin | Updated: February 23, 2016 00:03 IST
शिवाजीनगर रेल्वेपुलाला १०० पेक्षा जास्त वर्ष उलटल्याने त्याचे आयुष्य संपले आहे. २००१ मध्ये या पुलाच्या विस्तारीकरण व प्रस्ताव मनपाने तयार केला होता. मात्र तो निधी अभावी बारगळला. त्यानंतर आता २००९ मध्ये नविन पूल बांधण्याचा सुमारे १८ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन २०१० मध्ये तो युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल
शिवाजीनगर रेल्वेपुलाला १०० पेक्षा जास्त वर्ष उलटल्याने त्याचे आयुष्य संपले आहे. २००१ मध्ये या पुलाच्या विस्तारीकरण व प्रस्ताव मनपाने तयार केला होता. मात्र तो निधी अभावी बारगळला. त्यानंतर आता २००९ मध्ये नविन पूल बांधण्याचा सुमारे १८ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन २०१० मध्ये तो युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. हा नविन उड्डाणपूल सध्याच्या पुलाच्या ठिकाणीच म्हणजे जि.प. चौकापासून सुरू होईल. तो रेल्वे रूळ ओलांडून सरळ एक गल्ली ओलांडून दुसर्या गल्लीजवळ मिळेल. तर याच पुलावर सध्याच्या पुलाप्रमाणे डाव्या बाजूला शिवाजीनगरकडे जाण्यासाठी एक मार्ग असेल. असा प्रस्ताव होता. मात्र मनपाकडे निधी उपलब्ध नसल्याने पुलाचे काम अद्यापही झाले नाही. पुल कमकुमवत झाल्याने तो जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबत नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७० कोटी निधी मंजूर केला आहे. मात्र अद्याप काम सुरु झालेले नाही.