शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या शिवाजी पाटलांची कमाल; सायकलवरुन भारत दर्शन, आतापर्यंत केला 12 हजार किमीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 17:46 IST

नांदेडचे शिवाजी पाटील सायकलवरुन भारत भ्रमंतीवर निघाले आहेत. सध्या ते केदारनाथ येथे असून, सायकल हातात घेऊन कठीण चडाई करत आहेत.

Uttarakhand News: जगभरात सायकलने फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांना दूर-दूरपर्यंत सायकलवरुन फिरायची आवड असते. अशाच प्रकारची आवड असलेला व्यक्ती सायकलवरुन भारत दर्शनाला निघाला आहे. सध्या हा व्यक्ती उत्तराखंडमध्ये असून, तो त्याची सायकल घेऊन केदारनाथची चढाई करतोय.

केदारनाथमध्ये सायकल घेऊन चढाईसायकलवरुन भारत भ्रमण करणाऱ्या व्यक्तीचे नाव शिवाजी पाटील असून, ते नांदेड येथील रहिवासी आहेत. शिवाजी पाटील यांना सायकलवरुन फिरण्यची प्रचंड आवड आहे. ही आवड जोपासण्यासाठीच ते सायकलवरुन भारतातील विविध राज्यात जात असून, तेथील  लोकांना भेटणे आणि त्यांची संस्कृती जाणून घेण्याचे काम ते करत आहेत. भारत दर्शनाला निघालेले शिवाजी पाटील सध्या ते केदारनाथ इथे आहेत. जिथे, साधं चालूनही माणसाला प्रचंड थकवा येतो, तिथे शिवाजी पाटील सायकल घेऊन चढाई करत आहेत. 

देशाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी प्रवासगौरीकुंड ते केदारनाथ हे अंतर सुमारे 19 किमी असून रामबारा येथून खडी चढाईमुळे भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाजी पाटील सायकल घेऊन बाबा केदारनाथची यात्रा करत आहे. याबाबत शिवाजी पाटील यांनी सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर ते देशाच्या विविध राज्यात फिरुन स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहेत. गेल्या महिनाभरापासून ते उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. 

सध्या चारधाम यात्रेवरआजकाल शिवाजी पाटील चारधाम यात्रेवर आहेत. देशातील प्रत्येक राज्याची संस्कृती जाणून घेणे हा त्यांचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती घेणे, लोकांना भेटणे हे त्यांचे नित्य काम झाले आहे. शिवाजी पाटलांनी आतापर्यंत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश आणि हरियाणाला भेट दिली आहे. 

12 हजार किलोमीटरचा प्रवास शिवाजी पाटील यांनी सांगितले की, त्यांनी सहा महिन्यांत 12 हजार किलोमीटर सायकल चालवली आहे आणि चार धाममधील केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीला भेट दिल्यानंतर ते हिमाचलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दीड महिना हिमालाच प्रवास केल्यानंतर ते लडाख, काश्मीर, पंजाब, राजस्थान, यूपी आणि बिहारला भेट देणार आहेत. 20 महिन्यांच्या प्रवासात जास्तीत जास्त किलोमीटरचा प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :KedarnathकेदारनाथNandedनांदेडUttarakhandउत्तराखंड