शिवाजी महाराज जयंती.....
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
विविध कार्यक्रम : ठिकठिकाणी जयंती उत्सवाचे आयोजन
शिवाजी महाराज जयंती.....
विविध कार्यक्रम : ठिकठिकाणी जयंती उत्सवाचे आयोजनछत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजलीनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्सव साजरा करण्यात आला. विविध देखावे, रॅलीच्या आयोजनासह विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून छत्रपती शिवाजी महाराजांना मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.कामठीहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष रिजवाना कुरेशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहीली. यावेळी उपाध्यक्ष रणजित सफेलकर, मुख्याधिकारी विपीन मुद्दा, नगरसेवक मोहलता मेश्राम, मीना सफेलकर, अजय कदम, प्रमोद कामळे, प्रमोद कातोरे, प्रमोद वर्णम, कपिल गायधने, दिलीप बांडेबुचे, विकास रंगारी, वैशाली मानवटकर, मनीन खान, वीरेंद्र पानतावने, मेघा यादव, दर्शना गेडाम, कल्पना खडेलवाल, चंपा वाधवानी, प्रतिमा मेश्राम, ज्योती यादव, डॉ. महेश महाजन, काशिनाथ प्रधान, गणेश उईके, डॉ. आमना सिद्धीकी, रहत फरजाना आदी उपस्थित होते. गोयल टॉकीज चौकातील पूर्णाकृती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शहर भाजपचे प्रा. मनीष बाजपेयी यांनी माल्यार्पण केले. यावेळी भाजयुमोचे अध्यक्ष मंगेश यादव, नगरसेवक प्रमोद कातोरे, शांता गायधने, कपिल गायधने, कल्पना खंडेलवाल, अशोक चावला, राजेश खंडेलवाल, उज्वल रायबोले, श्रीकांत शेंदरे, सुषमा सिलाम, सुनील पाटील, संजय कनोजिया, पंकज वर्मा, सुनील सिलाम, विवेक मंगतांनी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्यावतीने उपजिल्हा प्रमुख राधेश्याम हटवार यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विराग जोशी, मुकेश यादव, विलास काटेखाये व शिवसैनिक उपस्थित होते. मनसेतर्फे विठ्ठल बावनकुळे व शामू महेंद्र यांच्या हस्ते माल्यार्पण करून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. बहुजन समाज पार्टीच्यावतीने नगरसेवक विकास रंगारी, दिपंकर गणवीर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमास बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.