शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले 'शिवनेरी'च्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारा, अमोल कोल्हेंची संसदेत शिवगर्जना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 17:22 IST

खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेतील पहिल्याच भाषणात छत्रपती शिवरायांचे नामस्मरण करुन

नवी दिल्ली - शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवनेरी किल्ल्यावर शिवसृष्टीची निर्मित्ती करण्याची मागणी संसदेत केली. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॅरिडॉर अंतर्गत किल्ले शिवनेरीवरती शिवसृष्टीची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनाची मागणी करत मंगळवारी संसदेत शून्यप्रहारामध्ये अमोल कोल्हेंनी लोकसभेत शिवगर्जना केली.

खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेतील पहिल्याच भाषणात छत्रपती शिवरायांचे नामस्मरण करुन आपले लक्ष्य वेधले होते. तसेच, बैलगाडा शर्यतीची मागणीही त्यांनी लावून धरली होती. त्यानंतर, संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील पहिल्या भाषणात, कोल्हे यांनी शिवसृष्टीची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शिवसृष्टीची निर्मिती झाली तर विश्वातील संपूर्ण शिवभक्तांसाठी हे एक प्रेरणास्थळ असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगासाठी प्रेरणादायी आहे, शिवसृष्टीच्या निर्मितीमुळे जगाला छत्रपती शिवरायांचा जीवनपट अनुभवता येईल. तसेच, रोजगार निर्मिती होऊन पर्यटनास चालनाही मिळेल, असे म्हणत अमोल कोल्हेंनी आपला मुद्दा लावून धरला. आबाल-वृद्ध, माता-भगिनी यांना शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर जाण्यासाठी रोप-वेची निर्मिती करून द्यावी, अशीही आग्रही मागणी कोल्हेंनी संसदेत केली. दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यामुळे शिवनेरी किल्ला हा मराठीजनांसाठी स्फुर्तीस्थान असून जगभरातील शिवप्रेमींसाठी प्रेरणास्थान मानले जाते. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShiv Smarakशिवस्मारक