शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

'हमारा पाकिस्‍तान' बोलून फसलेल्या मिका सिंगला शिवसेनेकडून सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 11:34 IST

गायक मिका सिंग यानं ' 15 ऑगस्ट को हमारा हिंदुस्थान आझाद हुआ और 14 ऑगस्ट को हमारा पाकिस्तान' असे विधान करुन नवीन वाद ओढवून घेतला आहे.

मुंबई, दि. 5 - गायक मिका सिंग आणि विवाद हे समीकरण तसे पाहायला गेले तर जुनेच आहे. मात्र आता मिका सिंग यानं ' 15 ऑगस्ट को हमारा हिंदुस्थान आझाद हुआ और 14 ऑगस्ट को हमारा पाकिस्तान' असे विधान करुन नवीन वाद ओढवून घेतला आहे. 'हमारा पाकिस्तान' असे विधान करुन अडचणीत आलेल्या मिका सिंगला सोशल मीडियावर चहुबाजूंनी सर्वांच्या क्रोधाचा सामना करावा लागत आहे.  

या प्रकरणात आता शिवसेनेनं उडी घेत मिका सिंगला सल्लावजा इशारा दिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानचा 'हमारा' असे उल्लेख करणा-या मिका सिंगला असा सल्ला दिला आहे की, कलाकारांनी व्यावसायिक लाभासाठी देशभक्तीसोबत तडजोड केली नाही पाहिजे. भारतात अशांतता निर्माण करू पाहणा-या पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारे नातेसंबंध ठेवणे चुक आहे आणि तसे करण्यात येऊ नये. 

काय आहे नेमके प्रकरण?ट्विटरवरील एक व्हिडीओमध्ये मिका सिंगनं 'हमारा पाकिस्तान' असे विधान केले आहे. यावरुन हा सर्व वाद निर्माण झाला आहे.  मिका सिंग 12 आणि 13 ऑगस्टला शिकागो आणि ह्युस्टन येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील नागरिकांसाठी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडीओ पोस्टमध्ये मिका लोकांना या कार्यक्रमाबाबत माहिती देताना दिसत आहे.  यादरम्यान मिकानं असेही म्हटले की ,  '15 अगस्‍त को हमारा हिंदुस्‍तान आजाद हुआ था और 14 अगस्‍त को हमारा पाकिस्‍तान.'   या विधानावरुन सोशल मीडियावर सर्व स्तरातून मिका सिंगवर टीका केली जात आहे.

मनसेचाही मिकाला इशारादरम्यान, मनसेकडून मिकाला इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानचे गोडवे गाणा-या मिकानं महाराष्ट्रात माइक धरुन दाखवावा, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.