शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ताजमहाल मकबरा की शिवमंदिर, सरकारला विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 11:49 IST

नवी दिल्ली, दि. 11 : जगातील सात आश्‍चर्यापैकी एक आश्‍चर्य असणारे ताजमहाल मकबरा आहे की प्राचीन शिवमंदिर? असा प्रश्न केंद्रीय माहिती आयोगानं (CIC)  सरकारकडे विचारला आहे. CICच्या या प्रश्नामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ताजमहाल संदर्भात माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या आधिरकारांतर्गत एक याचिका आयोगाकडे करण्यात आली होती. याच ...

नवी दिल्ली, दि. 11 : जगातील सात आश्‍चर्यापैकी एक आश्‍चर्य असणारे ताजमहाल मकबरा आहे की प्राचीन शिवमंदिर? असा प्रश्न केंद्रीय माहिती आयोगानं (CIC)  सरकारकडे विचारला आहे. CICच्या या प्रश्नामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ताजमहाल संदर्भात माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या आधिरकारांतर्गत एक याचिका आयोगाकडे करण्यात आली होती. याच मुद्द्यावर CICनं सांस्कृतिक मंत्रालयाचं मत विचारलं आहे. त्याचप्रमाणे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणलाही याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. संगमरवरनं बनलेलं जगप्रसिद्ध ताजमहाल हे शहाजान यांनी बनवलेला मकबरा आहे की राजा मानसिंह या राजपूत राजानं बनवलेला आणि मुगल शासकाला भेट दिलेलं शिवालय आहे? असा प्रश्न CIC चे आयुक्त श्रीधर आचार्यालू यांनी विचारला आहे.  उल्लेखनीय म्हणजे, याअगोदर ताजमहलच्या इतिहासाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टासमवेत देशातील इतर अनेक न्यायलयांनी खटले रद्दबादल ठरवलेत.  

जगातील भव्य-दिव्य अशा दहा वास्तूंच्या यादीमध्ये ताजमहालनं स्थान पटकावलं आहे. प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू Travellers’ Choice awards for Landmarks च्या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या यादीत जागा मिळवणारी ही भारतातील एकमेव वास्तू आहे. आशियातील भव्य वास्तूंचा विचार केला तर ताजमहालचा क्र मांक दुसरा लागतो. पहिलं स्थान कंबोडियामधल्या अंग्कोर वॅटनेच परत पटकावलं आहे. खरंतर भारतात अशा अनेक वास्तू आहे ज्यांची रचना आणि सौंदर्य हे पाहणाऱ्याला आवाक करतं. पण तरीही यादीत भारतातला ताजमहालच का? असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. याचं उत्तर जितकं ताजमहालचं सौंदर्य आहे तितकं ते सौंदर्य जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून पुरवलं जाणारं लक्षही आहे.