शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Wasim Rizvi : इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारणार वसीम रिझवी, यती नरसिंहानंद करून घेणार सनातन धर्मात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 08:12 IST

वसीम रिझवी हे अनेक वेळा कट्टरपंथी मुस्लिमांच्या निशाण्यावर असतात. त्यांनी कुराणातील 26 आयत काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती...

शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी (Wasim Rizvi) इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारणार आहेत. डासना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद गिरी महाराज हे त्यांचा सनातन धर्मात प्रवेश करवून घेतील. मिळालेल्या माहितीनुसार, रिझवी आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास गाझियाबादमधील डासना देवी मंदिरात हिंदू धर्मात प्रवेश करतील. संपूर्ण विधींसह अथवा रितीरिवाजासह त्यांचा हिंदू धर्मात प्रवेश करवून घेतला जाईल. (Shia waqf board former chairman wasim rizvi will accept hindu dharma)

काही दिवसांपूर्वीच जारी केले मृत्यूपत्र -वसीम रिझवी यांनी काही दिवसांपूर्वीच मृत्यूपत्र जारी केले आहे. यात त्यांनी घोषणा केली आहे, की मृत्यूनंतर आपले दफन करण्यात येऊ नये, तर हिंदू परंपरेप्रमाणेच आपल्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत. एवढेच नाही, तर यती नरसिंहानंद यांनी आपल्या चितेवर अग्नीसंस्कार करावेत, असेही रिझवी यांनी म्हटले होते.

रिझवी यांनी नुकताच एक व्हिडिओ जारी करत म्हटले होते की, मला ठार मारण्याचा आणि शिरच्छेद करण्याचा कट रचला जात आहे. माझा गुन्हा एवढाच आहे की, मी कुराणातील 26 आयतना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मुस्लिमांची मला मारण्याची इच्छा आहे. तसेच, त्यांनी मला कुठल्याही कब्रस्तानात जागा देणार नाही, असेही जाहीर केले आहे. यामुळे मी मेल्यानंतर माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे रिझवी यांनी म्हटले आहे.

कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर असतात रिझवी -वसीम रिझवी हे अनेक वेळा कट्टरपंथी मुस्लिमांच्या निशाण्यावर असतात. त्यांनी कुराणातील 26 आयत काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली होती. तेव्हापासून रिझवी मुस्लीम संघटनांच्या निशाण्यावर आहेत. रिझवी यांचा इस्लाम आणि शिया समाजाशी काहीही संबंध नसल्याचेही मुस्लीम संघटनां म्हणतात. एवढेच नाही, तर रिझवी हे मुस्लीम विरोधी संघटनांचे एजंट आहेत, असेही मुस्लीम संघटना म्हणतात.

टॅग्स :Islamइस्लामhindiहिंदीMuslimमुस्लीम