ॲशेस
By admin | Updated: July 9, 2015 23:57 IST
ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडला चोख प्रत्युत्तर
ॲशेस
ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडला चोख प्रत्युत्तरकार्डिफ : इंग्लंडच्या पहिल्या डावातील ४३० धावांना चोख उत्तर देत ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर ७० षटकांत ५ बाद २६४ धावा केल्या. हा संघ १६६ धावांनी मागे असून अद्याप पाच फलंदाज शिल्लक आहेत. शेन वाटसन २९ आणि नाथन लियॉन सहा धावांवर नाबाद होते.सलामीवीर ख्रिस रॉजर्सचे शतक पाच धावांनी हुकले. त्याने १३३ चेंडूत ११ चौकार व एका षटकारासह ९५ धावा ठोकल्या. कर्णधार मायकेल क्लार्क ३८ धावांवर मोईन अलीच्या चेंडूवर झेलबाद झाला. स्मिथने ३३ आणि व्होग्सने ३१ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाने चहापानापर्यंत २ बाद १४५ अशी मजल गाठली होती. नंतरच्या दोन तासांत त्यांनी आणखी तीन गडी गमावले.इंग्लंड पहिला डाव: सर्वबाद ४३०, ऑस्ट्रेलिया पहिला डाव ख्रिस रॉजर्स झे. बटलर गो. वूड ९५, डेव्हिड वॉर्नर झे. कूक गो. ॲण्डरसन १७, स्मिथ झे. कूक गो. अली ३३, मायकेल क्लार्क झे. आणि गो. अली ३८, व्होग्स झे, ॲण्डरसन गो. स्टोक्स ३१, वाटसन खेळत आहे २९, लियॉन खेळत आहे ६, अवांतर १५, एकूण : ७० षटकांत ५ बाद २६४ धावा. गडी बाद क्रम: १/५२, २/१२९, ३/१८०, ४/२०७, ५/२५८. गोलंदाजी : ॲण्डरसन १६-६-३६-१, ब्रॉड १२-१-५५-०, वूड १६-३-५९-१, मोईन अली १४-१-६७-२, स्टोक्स १२-५-३५-१..............