शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शेख हसीनांच्या लष्करी विमानाचे हिंडन एअरबेसवरून उड्डाण; कुठे गेले, लंडन की बांगलादेश? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 11:35 IST

Shaikh Hasina: सोमवारी सायंकाळी हसीना यांना घेऊन विमान भारताच्या हवाई दलाच्या तळावर उतरले होते.

विद्यार्थ्यांच्या उद्रेकामुळे बांगलादेश सोडून भारतात आलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांचे लष्करी विमान आज सकाळी आकाशात झेपावले आहे. सोमवारी सायंकाळी हसीना यांना घेऊन विमान भारताच्या हवाई दलाच्या तळावर उतरले होते. हसीना यांनी लंडनमध्ये राजाश्रय मागितल्याचे वृत्त होते. परंतू, काहीही माहिती न पडता हे विमान आज सकाळीच हसीना यांचे विमान परत माघारी रवाना झाले आहे. हसीना या हिंडन एअरबेसवरच आहेत.

मोठा दावा! शेख हसीनांना आर्मीनेच बांगलादेश सोडायला भाग पाडले, दिली ४५ मिनिटे...

बांगलादेशमधील दंगल आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधींसह अन्य नेते उपस्थित आहेत. परराष्ट्र मंत्री या नेत्यांना परिस्थितीची माहिती देत आहेत. अशातच हसीना यांचे विमान परतीच्या प्रवासाला निघाले आहे. 

हसीना या लंडन किंवा फिनलँडला जाऊ शकतात. त्यांची भाची ब्रिटनची खासदार आहे. हसीना यांच्यासोबत त्यांची बहीण आहे जी ब्रिटनची नागरिक आहे. तर दुसरीकडे हसीना यांच्या मुलाने त्यांनी ब्रिटनकडे राजाश्रय मागितल्याचे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान आंदोलकांनी बांगलादेशातील शेरपूर जिल्ह्यातील तुरुंगावर हल्ला केला. या तुरुंगातील ५०० कैद्यांना सोडविण्यात आले आहे.

तसेच चटगावमध्ये सहा पोलीस स्टेशनना आग लावण्यात आली आहे. याचबरोबर अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरांनाही लक्ष्य केले गेले आहे. बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी भ्रष्टाचाराच्या आरोपात शिक्षा भोगत असलेल्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना २०१८ मध्ये १७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.  

टॅग्स :Bangladeshबांगलादेश