शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

दहशत झुगारत तिने श्रीनगरमधील लाल चौकात दिल्या वंदे मातरमच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 22:00 IST

संवेदनशील मानल्या जाणाऱ्या काश्मीरमधील लाल चौक परिसरात राष्ट्रध्वज फडकावणेही सुरक्षा दलांसमोरील आव्हान ठरते. मात्र ही दहशत झुगारत एका महिलेने लाल चौकात वंदे मातरम्, भारत माता की जय च्या घोषणा देत हा परिसर दणाणून सोडला.

श्रीनगर, दि. 15 - देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असला तरी काश्मीरमधील श्रीनगर येथे मात्र या दिवशी तणावाचे वातावरण असते. फुटीरतावादी संघटना आणि दहशतवादी यांच्या धमक्यांमुळे येथील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या लाल चौक परिसरात राष्ट्रध्वज फडकावणेही सुरक्षा दलांसमोरील आव्हान ठरते. मात्र ही दहशत झुगारत एका महिलेने लाल चौकात वंदे मातरम्, भारत माता की जय च्या घोषणा देत हा परिसर दणाणून सोडला. या महिलेने धैर्य दाखवत केलेल्या या कृतीचा व्हीडिओ आाता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वातंत्र दिनी होणाऱ्या दहशतावादी कारवाया विचारात घेऊन लष्काराकडून काश्मीरमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येते. त्यात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या श्रीनगरमधील लाल चौक परिसरात तर संचारबंदी लागू केली जाते. मात्र अशा परिस्थितीत ही महिला तेथे वंदे मातरमच्या घोषणा देताना दिसत आहे. तसेच ती तेथे पहाऱ्यावर तैनात असलेल्या जवानांनाही अशा घोषणा देण्यासाठी आवाहन करत आहे. मात्र अघटित होऊ नये म्हणून  सुरक्षा दलांकडून त्या महिलेला तेथून बाहेर काढण्यासाठी धावपळ करावी लागल्याचेही दिसत आहे.   लाल चौक परिसरामध्ये फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांच्या समर्थकांचे वर्चस्व आहे. त्यामुळे येथे नेहमीच तणावाची परिस्थिती असते. येथे 1948 साली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकावला होता. त्यानंतर 1992 साली भाजपाचे तात्कालिन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी येथे तिरंगा फडकवला होता.  

काश्मीरमध्ये तिरंगा यात्रेसाठी निघालेल्या 200 भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक स्वातंत्र्यदिनानिमित्त काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी तिरंगा यात्रेत सामील झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यातील तणावाची परिस्थिती पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. भाजपाच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्याक्ष अैजाझ हुसैन यांच्यासह काही कार्यकर्त्यांना सोमवारी रात्री अटक केली. तर अबी गुलजार यांच्यासह काही जणांना आज सकाळी ताब्यात घेतले असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 200 भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचे समजते. याचबरोबर येथील मोबाईल इंटरनेट सेवा प्रशासनाकडून स्थगित करण्यात आली आहे.