शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

‘जेईई’ पास होऊनही तिने केली आत्महत्या

By admin | Updated: April 30, 2016 03:54 IST

अभियंता बनण्याची इच्छा नसलेल्या गाझियाबादच्या १७ वर्षीय कीर्ती तिवारी हिने आत्महत्येचे आततायी पाऊल उचलले.

जयपूर : जेईई (मुख्य) परीक्षा उत्तीर्ण होऊनही अभियंता बनण्याची इच्छा नसलेल्या गाझियाबादच्या १७ वर्षीय कीर्ती तिवारी हिने आत्महत्येचे आततायी पाऊल उचलले. गुरुवारी निकाल जाहीर होताच तिने राजस्थानमधील कोटा येथे वास्तव्याला असलेल्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपविले.निकालाबद्दल समाधानी नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे तिने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. कोटा हे एज्युकेशनल हब मानले जाते. यावर्षी तेथे कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांनी ताण सहन न झाल्यामुळे आयुष्य संपविण्याची ही पाचवी घटना आहे. आयआयटीसाठी कट आॅफनुसार १०० गुणांची आवश्यकता असताना कीर्तीने १४४ गुण मिळविले होते. मिळविलेल्या गुणांबाबत ती समाधानी नव्हती. नैराश्य आणि अभियांत्रिकी अभ्यासात स्वारस्य नसणे हे तिच्या आत्महत्येचे प्रथमदर्शनी कारण मानले जात आहे. व्हायचे होते खगोलशास्त्रज्ञ...कीर्तीला खगोलशास्त्रज्ञ व्हायचे होते. आयआयटी प्रवेशासाठी तिने जेईईची परीक्षा दिली असली तरी मुळात तिला अभियंता व्हायचे नव्हते. एकीकडे आयआयटीसाठी प्रयत्न तर दुसरीकडे खगोलशास्त्रज्ञ होण्याची इच्छा बाळगणे हे आश्चर्यकारक आहे. तिने वडिलांची क्षमा मागितली असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)—————————————मिळविले होते १४४ गुण...आईच्या इच्छेनुसार तिने विज्ञान विषय निवडला मात्र तिला भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्रात रुची नव्हती, असे कोटाचे पोलीस अधीक्षक एस.एस. गोदारा यांनी तिच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत सांगितले. ती दोन वर्षांपासून कोटा येथे शिक्षण घेत होती. तिच्यासोबत मातापित्यापैकी एक जण असायचे. तिचे वडील जीममध्ये गेले होते, तर आई गाझियाबादच्या निवासस्थानी होती. जवळ कुणी नसल्याचे पाहून तिने इमारतीवरून उडी घेण्याचे पाऊल उचलले. अभ्यासक्रमाचा न झेपावणारा ताण आणि कुटुंबियांचे अपेक्षांचे ओझे याच्या दबावाखाली मुले प्रवेश परीक्षेला सामोरे जात असल्याचे कोटा येथील या ताज्या घटनेवरून दिसून येते. बाहेरील विद्यार्थ्यांवर कोटा येथे कोचिंग क्लास आणि राहण्यासाठी होणारा खर्च आणि सामाजिक प्रतिष्ठा याचेही दडपण असते, असे प्रकर्षाने समोर येऊ लागले आहे.