शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बजरंगी भाईजानच्या भेटीसाठी 'ती' पाकमधून भारतात आली

By admin | Updated: July 31, 2015 21:15 IST

सलमानच्या प्रेमापोटी पाकमधील एका विवाहितेने व्हिसा न घेताच थेट भारत गाठले. पण या नादात तिला आता तुरुंगाची हवा खावी लागली असून सलमानला प्रत्यक्ष बघण्याचे तिचे स्वप्न अधूरेच राहिले.

 

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ३१ - बजरंगी भाईजान अर्थात सलमान खान हा वादग्रस्त अभिनेता असला तरी त्याचे चाहते अजूनही सलमानवर भरभरुन प्रेम करतात. सलमानच्या प्रेमापोटी पाकमधील एका विवाहितेने व्हिसा न घेताच थेट भारत गाठले. पण या नादात तिला आता तुरुंगाची हवा खावी लागली असून सलमानला प्रत्यक्ष बघण्याचे तिचे स्वप्न अधूरेच राहिले. 
 
पाकिस्तानमध्ये राहणारी २७ वर्षीय चंदा ही अटारी रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनमधून प्रवास करत असताना ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली. पाकिस्तानमधून आल्याचे चंदाने सांगितल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने पोलिसांना विविध कारणं सांगितली. पाकमधून मामासोबत भारतात आले मात्र माझे सर्व कागदपत्र मामाकडेच राहिले,  मुलाला दिर्घायूष्य मिळावे यासाठी प्रार्थना करण्यासाठी भारतात आले अशी कारणंही तिने देऊन बघितले. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने सत्य सांगितले व ते ऐकून पोलिसही चक्रावून गेले. चंदा ही सलमानची चाहती असून त्याची एक झलक बघण्यासाठीच सीमारेषा ओलांडून भारतात आले असे तिचे म्हणणे आहे. सलमानचा बजरंगी भाईजान हा महिन्यातच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली आहे. या चित्रपटात सलमान एका लहान मुलीला तिच्या पाकमधील घरी सोडण्यासाठी सीमारेषा ओलांडून पाकमध्ये जातो. चंदाने बहुधा याच चित्रपटातून प्रेरणा घेतली व ही बजरंगी बहन थेट भारतात आली.