शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'मोदीजी एवढं काम कराच, अन्यथा इतिहासात सर्वात खाली जाल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 12:23 IST

भारतीय जनता पक्षाचे बंडखोर खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे बंडखोर खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता पुन्हा एकदा सिन्हा यांनी ट्विट करून मोदींवर खोचक टीका केली आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यावरून सिन्हा यांनी मोदींवर निशाना साधताना म्हटले की, मोदीजी किमान एक तरी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रश्नांचा सामना करा. आता निवडणुकीची तारीख ही घोषित झाली आहे. त्यामुळे आता तरी एक स्वतंत्र आणि निष्पक्ष पत्रकार परिषद घेऊन टाका. परंतु ही पत्रकार परिषद बनावटी नसावी. तसेच केवळ दरबारातील  पत्रकार या परिषदेला उपस्थित नसावे, अशी विनंतीही सिन्हा यांनी केली. अन्यथा लोकशाहीच्या इतिहासात मोदींजी तुम्ही पंतप्रधान म्हणून तुम्ही सर्वात खाली जाल, असंही सिन्हा यांनी नमूद केले.

यावेळी सिन्हा यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी मोदींना प्रश्न विचारला की, तुम्हाला वाटत नाही का, सरकार बदलण्यापूर्वी आणि नवीन नेतृत्व येण्याच्या आधी तुम्ही एनडीएच्या सर्व पक्षांसोबत माध्यमांना सामोरे जावे. तुम्ही कार्यकाळाच्या शेवटच्या आठवड्यात आणि महिन्यात उत्तर प्रदेश, बनारस या भागांत 150 हून अधिक योजनांची घोषणा केली आहे. तरी मी तुम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो, असंही सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटले.  याआधी अनेकदा सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांवर टीका केली आहे. तसेच मोदी यांच्या विरोधातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे.

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९