शास्त्री टॉवरची होणार रंगरंगोटी बैठक: चौकही सुशोभित होणार
By admin | Updated: March 23, 2016 00:11 IST
जळगाव : एकेकाळी शहराचे वैभव म्हणून परिचित असलेल्या शास्त्री टॉवर रंगरंगोटीने सजणार असून वर्ष दीडवर्षापासून बंद असलेले या टॉवरवरील घड्याळी सुरू केले जाणार आहे. या संदर्भात मनपात आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन संस्थांना आवाहन करण्यात आले.
शास्त्री टॉवरची होणार रंगरंगोटी बैठक: चौकही सुशोभित होणार
जळगाव : एकेकाळी शहराचे वैभव म्हणून परिचित असलेल्या शास्त्री टॉवर रंगरंगोटीने सजणार असून वर्ष दीडवर्षापासून बंद असलेले या टॉवरवरील घड्याळी सुरू केले जाणार आहे. या संदर्भात मनपात आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन संस्थांना आवाहन करण्यात आले. शहरातील चौक सुशोभिकरणाची जबाबदारी स्विकारलेल्या संस्थांची बैठक महापौर नितीन ला, उपमहापौर ललित कोल्हे यांच्या उपस्थितीत झाली. काही संस्थांकडून चौक सुशोभिकरणाकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विद्रुपीकरण करणार्यावर गुन्हाविविध संस्था चौक सुशोभित करतात मात्र या चौकामध्ये लावलेल्या शोभेच्या वस्तुंवर जाहिरातीचे पोस्टर्स, स्टिकर्स चिकटविले जातात. यापुढे अशा प्रकारांची गंभीर दखल घेतली जाणार असून कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन स्टिकर असलेल्या संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे. एक्सीस बॅँकेने घेतलेल्या चौकाचे १ मेपूर्वी सुशोभीकरण केले जाईल असे संस्थेतर्फे सांगण्यात आले. तसेच टॉवर चौकाचे सुशोभिकरण आर.सी.बाफना पेढीतर्फे केले जाणार आहे. शास्त्री टॉवरला रंगरंगोटी व घड्याळ दुरुस्तीस तत्त्वत: मान्यता दिली असून त्यावर लवकरच अंतिम निर्णयाचे संकेत या संस्थेने दिले आहेत. महावीर ज्वेलर्सनेही चौक सुशोभिकरणास सकारात्मक प्रतिसाद दिला. ओरिएंट सिमंेटकडून प्रतिसाद नाहीशहरातील एक चौक ओरिएण्ट सिमेंट कंपनीने सुशोभिकरणासाठी घेतला आहे. मात्र या संस्थेचे कोणीही बैठकीस हजर नव्हते. सात दिवसात प्रतिसाद न मिळाल्यास हा चौक अन्य संस्थेस सुशोभिकरणासाठी दिला जाणार आहे. जैन उद्योग समूहाची मदत घेणारजैन उद्योग समूहाने शहरातील काव्यरत्नावली चौक सुशोभित केला आहे. कंपनीस आकाशवाणी चौक ते कोर्ट चौक या भाागतील दुभाजकाचे रंगरंगोटी तसेच त्यातील फुलांची रोपे संगोपनाची जबाबदारी स्विकारावी म्हणून विनंती केली जाणार आहे. के.के. कॅन्सनेही शहर सुशोभिकरणास मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच स्टेट बॅँकेनेही तयारी दाखविली आहे. बैठकीस मल्टी मीडिया फिचर्सचे सुशील नवाल, डॉ.नितीन रेदासनी, लक्ष्मीकांत मणियार व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.