शास्त्रीजींचे नव्हते संघाशी वैर, सल्ल्यासाठी गोळवलकर गुरूजींना बोलवत : लालकृष्ण अडवाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:48 AM2018-01-25T00:48:43+5:302018-01-25T00:48:53+5:30
जवाहरलाल नेहरू यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी शत्रुत्वाची भावना होती; पण लालबहादूर शास्त्री यांनी तसे कधी केले नाही. पंतप्रधान असताना ते तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना सल्ल्यासाठी बोलावत असत, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी म्हटले आहे.
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी शत्रुत्वाची भावना होती; पण लालबहादूर शास्त्री यांनी तसे
कधी केले नाही. पंतप्रधान असताना ते तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना सल्ल्यासाठी बोलावत असत, असे भाजपाचे
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी म्हटले आहे.
संघाचे मुखपत्र आॅर्गनायझरच्या ७०व्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित विशेषांकात अडवाणी यांनी शास्त्रींवर लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शास्त्री हे ध्येयनिष्ठ काँग्रेस कार्यकर्ते होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असे गुण होते की, त्यामुळे त्यांची देशभर वाहवा
झाली. नेहरूंप्रमाणे त्यांनी जनसंघ वा संघाशी कधीही वैचारिक शत्रुत्व बाळगले नाही.
चित्रपट समीक्षणे लिहायचो-
अडवाणी १९६० साली आॅर्गनायझरमध्ये सहायक संपादक म्हणून रुजू झाले. या साप्ताहिकाचे प्रतिनिधी म्हणून ते शास्त्रीजींना काही वेळा भेटले होते. विशाल हृदयाच्या लालबहादूर शास्त्रींचे दर्शन मला या भेटींमध्ये झाले, असे नमूद करून अडवाणी यांनी या लेखात म्हटले आहे की, पत्रकार म्हणून काम करताना मला पोशाखातही काही बदल करावा लागला.
संघाचा स्वयंसेवक म्हणून सदरा, धोतर असा पोशाख असे; पण हा पोशाख नेत्याला शोभून दिसतो, पत्रकाराला नाही, असे सहकाºयांनी सांगितल्यावर मी पँट घालू लागलो.
राजकीय घडामोडींमध्ये रस असूनही मी आॅर्गनायझरसाठी चित्रपटांची समीक्षणे लिहित असे. चित्रपट माझा अत्यंत आवडीचा विषय होता.
शास्त्रींचा ‘लोकनेता’ म्हणून भागवतांनीही केला होता गौरव-
भारताचे पंतप्रधानपद भूषविलेले लालबहादूर शास्त्री यांचा उल्लेख सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेल्या वर्षी ‘लोकनेता’ असा केला होता. अलाहाबाद येथे लालबहादूर शास्त्री व त्यांच्या पत्नीच्या पुतळ््याचे अनावरण मोहन भागवत यांच्या हस्ते झाले होते.