शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शशिकला यांना तुरुंगात व्हीआयपी वागणूक

By admin | Updated: July 14, 2017 04:45 IST

अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना बंगुळुरू तुरुंगामध्ये व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचे उघडकीस आले

बंगळुरू : बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना बंगुळुरू तुरुंगामध्ये व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचे उघडकीस आले आहे. तुरुंग उपमहानिरीक्षक डी रूपा यांनी या बेकायदेशीर गोष्टी करण्यास तुरुंगातील अधिकारीच परवानगी देत असल्याचा आरोप केला आहे. स्टॅम्प घोटाळ्यातील अब्दुल करीम तेलगीलाही तुरुंगात विशेष सुविधा मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.त्यांच्या या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण डी. रूपा यांनी तुरुंगांतील या प्रकारांची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिल्यामुळे कर्नाटकचे पोलीस महासंचालक (कारागृह) सत्यनारायण राव संतापले आहेत. डी रूपा यांनी सत्यनारायण राव व पोलीस महानिरीक्षक आर के दत्ता यांना पत्र लिहून हा खुलासा केला आहे. शशिकला यांना स्वयंपाकासाठी स्वतंत्र रुम देण्यात आली आहे. शशीकला यांना महिन्यातून दोन जणांना भेटण्याची परवानगी असताना ३१ दिवसांत १४ लोक भेटले, असेही डी.रूपा यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तुरुंगातील २५ जणांची १0 जुलै रोजी ड्रग टेस्ट घेण्यात आली होती. त्यापैकी १८ जणांनी त्यावेळी ड्रग घेतल्याचे निष्पन्न झाले, असेही त्यांनी अहवालात म्हटले आहे.कारागृहात होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छित आहे. शशीकला यांना व्हीव्हीआयपी वागणूक देण्याच्या बदल्यात दोन कोटी रुपयांची लाच घेण्यात आली आहे. आपण संबंधितांवर कारवाई करावी, असेही डी. रूपा यांनी अहवालवजा पत्रात म्हटले आहे. "सत्यनारायण राव यांनी मात्र कारागृहात कोणालाही व्हीआयपी वागणूक दिली जात नाही, असा दावा केला असून, उपमहानिरीक्षकांना काही चुकीचे वा अयोग्य आढळले होते, तर त्यांनी ते आपल्या निदर्शनास आणून देणे गरजेचे होते. त्यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे जाण्याचे कारण नव्हते, असे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)अण्णा द्रमुक तिथूनच चालवतात!बेहिशेबी संपत्तीप्रकरणी न्यायालयाने शिक्षा जाहीर केल्यानंतलर शशिकला यांनी १६ फेब्रुवारी रोजी न्यायालयात आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर त्यांना कारागृहात पाठवण्यात आले. अण्णा द्रमुकचे राजकारण त्या आजही तेथूनच चालवतात, असा आरोपही त्यांच्यावर केला जात आहे.