शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

शशिकला व कुटुंबीयांना पक्षातून बाहेर रस्ता

By admin | Published: April 20, 2017 12:45 AM

तामिळनाडूतील वेगवान राजकीय घडामोडीत सरचिटणीस शशिकला, टीटीव्ही दिनकरन व त्यांच्या कुटुंबीयांना

चेन्नई : तामिळनाडूतील वेगवान राजकीय घडामोडीत सरचिटणीस शशिकला, टीटीव्ही दिनकरन व त्यांच्या कुटुंबीयांना अण्णाद्रमुकपासून दूर ठेवण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यामुळे दोन गटांतील ऐक्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. शशिकला यांच्या विरुद्धच्या धर्मयुद्धातील हे पहिले यश आहे असे ओ. पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे. पनीरसेल्वम म्हणाले की, अण्णाद्रमुक पक्ष शशिकला कुटुृंबाच्या हातात जाऊ नये यासाठी आपण संसद सदस्य आणि आमदारांच्या मदतीने धर्मयुद्ध छेडले होते. मंगळवारी रात्री उशिरा मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार शशिकला, टीटीव्ही दिनाकरन व त्यांच्या कुटुंबाला अण्णाद्रमुक पक्षापासून व सरकारच्या कामकाजापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जनता आणि पक्ष कार्यकर्ते यांच्या इच्छेनुसारच हा संघर्ष सुरु केला होता आणि तो यापुढेही सुरुच राहिल.आमदार आपल्या पाठिशी अण्णाद्रमुकचे सर्व आमदार आपल्या पाठीशी आहेत. पक्षात कोणीही आपल्या विरोधात नाही, असा दावा करतानाच, ऐक्याच्या प्रक्रियेच्या आड आपण येणार नाही, असे दिनकरन यांनी म्हटले आहे. दिनकरन यांच्याविरुद्ध निर्णय घेतल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, पक्षाच्या हितासाठी लवकरच एक चांगला निर्णय घेतला जाईल. आर्थिक गुन्ह्यासंबंधीच्या एका प्रकरणात ते आज न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे. फेरा नियमांच्या उल्लंघनप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एक प्रकरण सुरु आहे. दिनकरन यांच्याविरुद्ध लुक आउट नोटीस दिनकरन यांच्याविरुद्ध लाचेच्या प्रकरणात लुक आउट नोटीस जारी झाल्यानंतर तिच्या आवश्यकतेवरच दिनकरन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपला पासपोर्ट न्यायालयात असताना मी पळून कसा काय जाणार?,असा सवाल त्यांनी केला. आपल्याच गटाला दोन पानांचे निवडणूक चिन्ह मिळावे यासाठी दिनकरन यांनी लाच देऊ केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दिनकरन अनिवासी भारतीय असून ते देश सोडून बाहेर जाऊ शकतात, अशी शक्यता गृहित धरून नोटीस जारी झाली आहे.