शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शशिकलांचं राजकीय भवितव्य अंधारात

By admin | Updated: February 14, 2017 11:22 IST

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी एआयएडीएमके पक्षाच्या महासचिव शशिकला यांना सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवत चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 14 -  बेहिशेबी संपत्तीप्रकरणी एआयएडीएमके पक्षाच्या महासचिव शशिकला यांना सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवत चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे तामिळनाडूतील राजकारणात उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने शशिकला यांच्याविरोधात निकाल दिल्यानं त्यांचे राजकीय भवितव्य अंधारात असल्याचे दिसत आहे. कारण पुढील 6 वर्ष त्यांच्यावर निवडणूक लढण्यावर बंदी घालण्यात आली आहे, शिवाय पुढील 10 वर्षे मुख्यमंत्रीपदापासूनही त्यांना दूर राहावं लागणार आहे. 
 
21 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यासह शशिकला आणि अन्य दोन साथीदारांना बंगळुरुच्या विशेष कोर्टाने 4 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर 2015 मध्ये कर्नाटक हायकोर्टाने चौघांचीही सुटका केली होती.
 
नेमके काय आहे प्रकरण?
जयललिता यांच्यावर 1991 ते 1996 या काळात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप होता. 1996 मध्ये बेहिशेबी संपत्तीचा खटला दाखल करण्यात आला होता.  यावेळी जयललिता यांनी तत्कालीन उत्पन्नापेक्षा 66 कोटी अधिक बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा आरोप करण्यात आला होता. जयललिता यांच्यासोबत दत्तकपुत्र सुधाकरन, शशिकला आणि शशिकला यांची भाची इल्वारासी यांनाही आरोपी करण्यात आले.
(शशिकलांचं स्वप्न भंगलं, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दोषी)
 
यादरम्यान जयललितांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी  880 किलो चांदी, 28 किलो सोने, 10 हजार 500 साड्या, 750 चपलांचे जोड, 91 घड्याळं आणि अन्य महागड्या वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.  2002 मध्ये जयललिता यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण कर्नाटक कोर्टाकडे सोपवले.
 
बंगळुरुच्या विशेष कोर्टाने 27 सप्टेंबर 2014 रोजी या प्रकरणी निकाल दिला. यावेळी  जयललिता यांना 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, सोबत 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. शशिकला, इल्वारासी आणि सुधाकरन यांनाही 4 वर्षांची शिक्षा व प्रत्येकी दहा कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.  
 
यानंतर 11 मे 2015 रोजी कर्नाटक हायकोर्टाने या प्रकरणात  सबळ पुरावे नसल्याचे  सांगत चौघांचीही सुटका केली. जयललिता तुरुंगात गेल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा भार पन्नीरसेल्वम सांभाळत होते. मात्र अम्मांची सुटका होताच, पन्नीरसेल्वम यांनी तात्काळ राजीनामा दिला. जयललिता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तामिळनाडूच्या सीएम झाल्या.