शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

शशिकलांची माघार, धोरणात्मक चाल; अण्णाद्रमुकमध्ये प्रबळतेची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 05:43 IST

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मिळणाऱ्या यशावर पुढील पावले टाकणार

असिफ कुरणे

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणातून माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जवळच्या सहकारी व्ही. शशिकला यांनी निवृत्तीची घोषणा करून अनेकांना धक्का दिला. सत्ताधारी अण्णाद्रमुक आघाडीसाठी ही दिलासा देणारी बाब असली तरी शशिकला यांचा हा निर्णय एक धोरणात्मक चाल असल्याचे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे. जयललिता यांच्या पश्चात होणाऱ्या या दुसऱ्या निवडणुकीत मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत त्यांना किती यश मिळते, यावर शशिकला यांची पुढील चाल अवलंबून असणार आहे.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांच्या शिक्षेनंतर शशिकला यांचे ज्याप्रकारे तामिळनाडूमध्ये स्वागत झाले त्यानुसार विधानसभा निवडणुकीत त्या महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, गेल्या बुधवारी त्यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत आपली माघार जाहीर केली. पण त्याचवेळी त्यांनी आपला मुख्य विरोधी द्रमुकला पराभूत करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या भूमिकेने अण्णाद्रमुकला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण शशिकला पुतण्या टीटीव्ही दिनकरन यांच्या एएमएमके पक्षाचा प्रचार करतील, असा कयास होता. दिनकरन यांच्या एएमएमकेने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास २२ लाख मते मिळवत (४ टक्के) आपले महत्त्व दाखवून दिले आहे. दिनकरन विधानसभेच्या माध्यमातून यात आणखी भर घालू इच्छितात. अण्णाद्रमुक पक्षात शशिकला यांना मानणारा  मोठा गट आजही कार्यरत असून, तो त्यांच्यासोबत जाण्याचा धोका होता. पण त्यांनी आता घेतलेल्या माघारीमुळे एएमएमके सत्ताधारी आघाडीत सामील होण्याची चिन्हे आहेत. शशिकला यांनी माघार घेत एकाचवेळी दोन-तीन लक्ष्य समोर ठेवल्याचे चित्र दिसते. निवडणुकीत थेट सहभागी होत नसल्यामुळे केंद्र, राज्य सरकारच्या तपास यंत्रणाचा इतर प्रकरणातील ससेमिरा थांबेल.

निकालानंतर अण्णाद्रमुकमधील पलानीस्वामी, पनीरसेल्वम यांची ताकद कळेल. तसेच अण्णाद्रमुक समर्थकांमध्ये जयललिता यांच्यानंतर योग्य नेतृत्व म्हणून शशिकला यांचे नाव पुढे येईल, असा अंदाज आहे. पनीरसेल्वम, पलानस्वामी हे सत्तेतून बाहेर जाणे हेच शशिकला यांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच एवढ्या घाईगडबडीत मोठी निवडणूक लढवून धोका पत्करण्यापेक्षा योग्य संधीची वाट पाहण्याचा मार्ग शशिकला यांनी निवडला आहे. त्यांनी राजकारणातून नाही तर विधानसभा निवडणुकीतून तात्पुरती माघार घेतली आहे. निवडणूक निकालानंतर त्या आपली चाल पुन्हा खेळतील आणि अण्णाद्रमुक पक्षात पूर्वीसारखे स्थान निर्माण करतील, असा अनेक जाणकारांचा अंदाज आहे.

पराभवाचे खापर फुटण्याचा धोकाशशिकला यांनी आता अण्णाद्रमुक आघाडीसोबत सक्रिय सहभाग दाखवला असता तर यशा-अपयशाच्या मानकरी त्याच ठरल्या असत्या. लोकसभेचा निकाल आणि तामिळनाडूमधील सध्याचे वातावरण पाहता अण्णाद्रमुक आघाडी पुन्हा सत्तेत येईल, याची शक्यता कमी दिसते. निवडणूक चाचण्यांनीदेखील द्रमुकच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे पराभवाचे खापर आपल्यावर फुटू नये, याची काळजी शशिकला यांनी घेतली आहे.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूTamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१